- पंकज पाटील
अंबरनाथ - जर तुम्ही ५० खोके घेतलेच नाहीत, तर तुम्हाला इतका राग का येतो. 50 खोके वर रॅप सॉंग बनवणाऱ्या राज मुंगसे याने माफी न मागण्याच्या निर्णयाचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथमध्ये बुधवारी सायंकाळी इफ्तार पार्टी निमित्त माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आले होते. यावेळी राज मुंगसे याने पन्नास कोके स्वामी संदर्भात माफी न मागण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता आव्हाड यांनी मुंगसे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. त्याच्या विचारांमध्ये आंबेडकरी विचारांची धार आहे, त्यामुळे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विद्रोहावर बोलला आणि कुणाचीही माफी मागणार नाही असे त्याने ठामपणे सांगितले. मला या तरुण पोराचे कौतुक वाटते. तरुण पोरे महाराष्ट्रात विद्रोह करतात. सरकार जे अन्याय करतेय, जी दादागिरी करतेय, जेलमध्ये टाकण्याची भाषा करतेय, त्याला कुठेतरी आव्हान ही नवीन पोरे देतायत हे बघून खूप बरे वाटल्याची प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली. अंजली दमानिया यांच्या विधानाबाबत विचारले असतात आव्हाड यांनी अंजली दमानिया यांची खिल्ली उडवत एवढ्या मोठ्या राजकारणापासून मी अलिप्त असतो. मी गल्लीबोलात राजकारण करत असतो. अंजली दमानिया, बावनकुळे ही सगळी मोठी माणसं आहेत. त्यांच्या मेंदूतून काय निघेल, तेवढा माझा मेंदू उच्च प्रतीचा नाही असे स्पष्ट केले.