ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि एम आयडीसीला पाणी पुरवठा करणारे अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरण आज सायंकाळी भरले.या धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घन मीटर पाणी साठा तयार झाला.
दुपारी ०४:०० वाजता धरणाची पातळी ७२.६० मी तलांकावर गेल्यानंतर स्वयंमचलित वर्कद्वारे आपोआप उघडून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे व पाणी पातळी ७२.६० मी. तलांकापेक्षा खाली गेल्यानंतर स्वयंमचलित वर्कद्वारे आपोआप बंद होऊन पाण्याचा विसर्ग थांबेल. धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे.
बारवी धरण पूर्ण क्षमतेने पाणी साठवण करणे नियोजित आहे. नदी काठच्या नागरिकांना सावध राहण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या बारवी धरणाचे ११ स्वयंचलित दरवाजे (वक्र व्दारे) आपोआप उघडले जात आहे. सततच्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी ७२.६० मीटर होताच धरणाचे दरवाजे आपोआप उघडले आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग होऊन धरणाखालील पाण्याचा वेग वाढणार. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाखालील व बारवी नदी काठावरील शहरांसह १२ गांवपाड्यांना सतर्कतचा इशारा एमआयडीसीने जारी केला आहे.
सततच्या पावसामुळे या बारवी धरणात पाण्याचा येवा सतत सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत सतत वाढली आहे. या बारवी नदीच्या या धरणाखाली पाण्याचा प्रवाह वाढून त्याचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून या धरणाखालील व नदी काठावरील तब्बल १२ गांवाना सतर्कतेचा इशारा एमआयडीसीने जारी केला आहे.
बारवी नदीच्या तीरावरील विशेषत: अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोयाचापाडा, चोण, रहाटोली व नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा, गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदींना गांवातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे एमआयडीसीने सुचीत केले आहे. या कालावधीत कोणीही नागरीक, ग्रामस्था आणि पर्यटकांनी नदीच्या पात्रात उतरू नये. पोहण्यास मज्जाव करण्याचा सूचना या एमआयडीसीच्या बारवी धरण कार्यकारी अभियंता यांनी जारी केल्या आहेत.