शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

अंबरनाथचे बारवी धरण कोणत्याही क्षणी भरणार, दरवाजे आपोआप उघडणार; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

By सुरेश लोखंडे | Published: July 27, 2023 4:30 PM

सततच्या पावसामुळे या बारवी धरणात पाण्याचा येवा सतत सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत सतत वाढ होत आहे.

ठाणे : जिल्हह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पाणी पुरवठा करणाºया धरणांच्या पाणलोटातही या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तानसा धरणाच्या पाठोपाठ आता बारवी धरण कोणत्याही क्षणी भरून त्याचे ११ स्वयंचलित दरवाजे (वक्र व्दारे) आपोआप उघडणार आहेत. सध्या या धरणाची पाणी पातळी ७०. ८० मीटर झाली आहे. सततच्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी ७२.६० मीटर होताच धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आपोआप उघडल्या जाणार आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग होऊन धरणाखालील पाण्याचा वेग वाढणार. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाखालील व बारवी नदी काठावरील शहरांसह १२ गांवपाड्यांना सतर्कतचा इशारा एमआयडीसीने जारी केला आहे.

सततच्या पावसामुळे या बारवी धरणात पाण्याचा येवा सतत सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. या धरणाची उच्चतम विसर्ग पाणी पातळी ७२.६० मी. होताच धरणाचे ११ स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार आहे.त्यामुळे बारवी नदीच्या या धरणाखाली पाण्याचा प्रवाह वाढून त्याचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून या धरणाखालील व नदी काठावरील तब्बल १२ गांवाना सतर्कतेचा इशारा एमआयडीसीने जारी केला आहे. सद्यस्थितीतील अतिवृष्टीमुळे या धरण परिसरातील उल्हास नदीत पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य होत नसल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता धरणाची पाणी पातळी कधीही ७२.६० मी. तलांक गाठुन स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडले जाणार आहे. त्यामुळे बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात सुरु होऊ शकतो.'

बारवी नदीच्या तीरावरील विशेषत: अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोयाचापाडा, चोण, रहाटोली व नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा, गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदींना गांवातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे एमआयडीसीने सुचीत केले आहे. या कालावधीत कोणीही नागरीक, ग्रामस्था आणि पर्यटकांनी नदीच्या पात्रात उतरू नये. पोहण्यास मज्जाव करण्याचा सूचना या एमआयडीसीच्या बारवी धरण कार्यकारी अभियंता यांनी जारी केल्या आहेत.धरणातील पाणी साठा व टक्केवारी- भातसा धरणात  ६०२.८० (६३.९८ टक्के) दशलक्ष घनमीटर (दलघमी.) बारवीत  २८७.२२ (८५ टक्के) दलघमी. पाणी साठा झाला. आंध्रा धरणात २१६.५१ (६३.८४ टक्के)दलघमी साठा मध्ये वैतरणात १३७ (७०.७९ टक्के) दलघमी तर अप्पर वैतरणात १७९.५३ (५४.१९ टक्के) दलघमी साठा आहे. मोडक सागरमध्ये ११७.९६ (९१.४९ टक्के) दलघमी  पाणी साठा आजपर्यंत झाला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ