ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. 02 - कल्याण व भिवंडी तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या ब्रिटिश कालीन पत्री लोखंडी पुल पडल्याने येथील हजारो नागरिकांच्या ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. याची पहाणी करण्यासाठी भिवंडी आमदार शांताराम म्हात्रे व शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी भेट दिली. यावेळी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था म्हणून होडी साठी आठ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रधान देखील येथील ग्रामस्थ व उपसरपंच मनोज पाटील यांना दिले आहे.
गेली कित्येक वर्षां पासून सदर पुलावर येथे 15 ते 20 गावातील हजारो लोक ये-जा करत आहेत. परंतू दिवाळी सणाच्या दिवशीच हा पुल पडला असल्याने या लोकांचा येण्या जाण्याचा मार्गच बंद झाला आहे. याची पहाणी करण्यासाठी भिवंडी आमदार शांताराम म्हात्रे व शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील भेट दिली. यावेळी त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात या लोकांना ये-जा करण्यासाठी होडीची व्यवस्था व्हावी म्हणून आठ लाख रूपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांना पत्र दिला आहे.