ठाणे : अमृता प्रीतम यांचे साहित्य कथा कांदबरी कविता असं अष्टपैलु गुणांचे सादरीकरण श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी लीलया केले. आपण नेहमी इश्वरा जवळ मागत असतो. पण अमृता प्रीतम यांनी तर इश्वराला काही तरी करायला सांगितले. अमिता चक्रदेव यांनी सादर केलेल्या साई तु अपने चिल्म से थोडी आग दे दे या कवितेतून ते दिसून आले. ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ आयोजित ब्रह्मांड कट्टयावर सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकी मागे, आझादनगर, ठाणे येथे बिल्वा प्रस्तुत सहस्तकातली साहित्यिका अमृता प्रीतम यांच्या जन्म शताब्दी निमित्त एक आगळा वेगळा साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाची संहिता आणि सादरीकरण श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी सादर केला. अमृता प्रीतम यांचा जन्म दिनांक 31 ऑगस्ट 1919 रोजी पाकिस्तान मधील गुजरावाला येथे झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांचे बालपण गेले. फाळणीपूर्वी व फाळणी नंतरच्या बदलांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. स्वतंत्र मनोवृत्तिच्या, निर्भय, संवेदनशील मनाच्या अमृता प्रीतम यांच्या लेखणीतून त्यांच्या या स्वभावाचे दर्शन घडते. अगदी लहान वयात त्यांच्या आईचे मृत्यु दर्शन झाले. त्यांच्या त्या कोवळ्या वयात लिहलेल्या 'मजबूर' या कवितेचे सादरी करण अमिता चक्रदेव यांनी सादर केले. स्रीला नेहमीच समाजात दुय्यम स्थान मिळते. याचे विदारक वर्णन अमृता प्रीतम यांच्या 'चिठ्ठी' या कवितेत दिसून येते त्याचे सादरीकरण श्रध्दा वझे यांनी अत्यंत भावपूर्ण शैलीत करुन रसिकांच्या मनात ठाव घेतला. अमृता प्रीतम यांनी समाजाच विदारक चित्र त्यांच्या कवितेतून थोर कवी वारिस शाह यांना आवाहन केले आहे. अमृता प्रीतम यांच्या साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कारांने गौरविले गेले. त्यांच्या साहित्याचा अनुवाद तब्बल 36 भाषेत झाले आहे. त्यांना कविता सादर करण्यासाठी वेगवेगळ्या देशातून आमंत्रित केले गेले. अत्यंत मनाला भावणारे सत्य परिस्थितीचे भान असणारे काळजाला भिडणारे त्यांचे साहित्य अमित चक्रदेव व श्रध्दा वझे यांनी प्रेक्षकांसमोर सादर केले. स्रीच्या हळव्या मनाचे सादरीकरण श्रद्धा वझे यांनी अमृता प्रीतम यांच्या 'मायका' या कवितेतून केले. त्यांच्या जीवनात आलेल्या प्रेमळ माणसांचे वर्णन त्यांच्या कवितेतून दिसून येते. त्यांचे साहित्य प्रेमाचा अविष्कार तर प्रतिभा आणि प्रतिमा यांचे मिलन होते. त्यांचे प्रेम 'बेपनाह मुहब्बत व सिगरेट' या कवितेतून दिसून येते त्याचे सुंदर सादरीकरण श्रध्दा वझे यानी केले. आयुष्याच्या अखेरीस थोर चित्रकार इमरोज यांच्या बरोबर आयुष्य वथीत करताना त्यांचा कवितेत त्यांची स्वतंत्र मनोवृति दिसून येते. त्या लिहतात "में तेरी समाज और तू मेरा समाज और कोई समाज नही". अमृता प्रीतम यांचे लिहणे म्हणजेच त्यांच जगनं होत. अशा या थोर साहित्यिकेच्या साहित्याची उकल श्रध्दा वझे व अमिता चक्रदेव यांनी केली व रसिकांनी त्यांना भरभरुन दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा परिचय महेश जोशी, स्वागत प्रगती जाधव तर आभार प्रदर्शन आयोजक राजेश जाधव यांनी केले.