लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भारताचा 74 वा स्वांतत्र्य दिनाचा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्या वतीने मोठया उत्साहात रविवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या बॅन्ड पथकाने राष्ट्रगीतावर शानदार बॅन्डचे वादन केले. ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. तत्पूर्वी, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना अग्निशमन दलासह सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना दिली.यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.तद्नंतर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्र मांतर्गत आकर्षक रांगोळी तसेच फुलांची सजावट आणि ध्वनीफितीचे सादरीकरण करु न स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्र माचा शुभारंभ महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते झाला. तसेच महाराष्ट्र शासन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागातर्फे माझी वसुंधरा अभियान २०२० अंतर्गत हरित शपथ घेण्यात आली. यावेळी ठाणेकरांच्या वतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करु न त्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याच्या शपथेचे वाचन महापौर म्हस्के यांनी केले. सर्वांनीच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तत्पर राहणार असल्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्र माचा महापौर आणि आयुक्तांच्या शुभहस्ते शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 8:48 PM
भारताचा 74 वा स्वांतत्र्य दिनाचा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्या वतीने मोठया उत्साहात रविवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या बॅन्ड पथकाने राष्ट्रगीतावर शानदार बॅन्डचे वादन केले.
ठळक मुद्देठाणे महापालिकेच्यावतीने स्वांतत्र्य दिन उत्साहात साजरा