कॉंग्रेसची विस्तारीत कार्यकारणीची बैठक होणार ठाण्यात

By अजित मांडके | Published: April 6, 2023 02:41 PM2023-04-06T14:41:29+5:302023-04-06T14:42:11+5:30

राज्यातील दिग्गज नेते लावणार हजेरी, कॉंग्रेस करणार शक्तीप्रदर्शन

an extended executive meeting of congress will be held in thane | कॉंग्रेसची विस्तारीत कार्यकारणीची बैठक होणार ठाण्यात

कॉंग्रेसची विस्तारीत कार्यकारणीची बैठक होणार ठाण्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कॉंग्रेसची ठाण्यात गेलेली पत परत मिळविण्यासाठी कॉंग्रेसने पुन्हा हालचाली सुरु केल्या आहेत. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यात पुढे निघाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस मागे कशी राहिली. त्यांनी देखील आता ठाण्याकडे पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार आता ठाण्यात पहिल्यांदाच राज्यातील दिग्गज नेत्यांची फळी ठाण्यात अवतरनार आहे. ठाण्यात विस्तारीत कार्यकारणीची बैठक येत्या १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

कॉंग्रेसच्या वतीने जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारणीची बैठक प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण तसेच प्रदेश कार्याध्यक्ष, सहप्रभारी आदींसह इतर दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. येत्या १० एप्रिल रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वाजता ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत नवीन कार्यकारणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठरावही केले जाणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. तसेच या निमित्ताने जय भारत यात्रेचा शुभांरभ केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी सत्याग्रह आणि स्वातंत्रविरांची रॅली देखील काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यातून गटबाजीला तिलांजली दिली जाणार असून मतदारापर्यंत कॉंग्रेसचा प्रयत्न असणार आहे.

एकूणच मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी जनतेची सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच ठाण्यात रोशनी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर ठाणेकरांची सहानभुती मिळविण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चो काढला होता. परंतु यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची छाप दिसून आली. त्यात कॉंग्रेस काहीसा मागे पडल्याचे दिसून आले आहे. परंतु आता कॉंग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आता कॉंग्रेसने देखील ठाण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे या विस्तारीत कार्यकारणीच्या बैठकीच्या माध्यमातून कॉंग्रेस शक्तीप्रदर्शनही करणार असल्याचे दिसत आहे.

 राहुल गांधी यांनी सावरकरांचा विरोध केला असतांना शहर कॉंग्रेसच्या वतीने या विस्तारीत बैठकीच्या अनुषंगांना स्वांतत्र्यविरांची यात्रा काढणार आहे. यात सावरकरांचा देखील सन्मान केला जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सावरकर हे मराठी असून ते महाराष्टÑातील होते. त्यामुळे त्यांचा सन्मान केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: an extended executive meeting of congress will be held in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.