लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : द्वारली गावातील वादग्रस्त जमिनीच्या मालकाने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता दिलेल्या तक्रारीवरून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अवघ्या दीड तासांतच हिललाइन पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्याकडून गोळीबाराची घटना घडली.
३१ जानेवारीला जमिनीच्या वादातून एकनाथ जाधव यांच्या कुटुंबीयांना गायकवाड यांच्यासह समर्थकांनी जातिवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार मधुमती ऊर्फ नीता जाधव यांनी २ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता केली. त्यानुसार आ. गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारेख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश वारघेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
जमिनीचा वाद पेटलाn२ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता महेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी वादग्रस्त जागेवरील कंपाउंडचे पोल फेकून दिले. nया प्रकरणी मे. फेअरडील डेव्हलपर्सचे भागीदार जितेंद्र पारीक यांच्या तक्रारीवरून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल झाला. या वादातून आ. गायकवाड आणि महेश गायकवाड पोलिस ठाण्यात गेले होते.