सुरेश लोखंडेठाणे : विदर्भाच्या नक्षलग्रस्त भागात राहून कष्ठाने शिक्षण घेतलेल्या अण्णाजी दयाराम कुळसेंगे या ंशिक्षकालाठाणेजिल्हा परिषदेत नऊ वर्षांपूर्वी शिक्षकाची नोकरी मिळाली. मात्र तत्काली मिळालेल्या शिक्षक नियुक्ती आदेशावर अण्णाजी ऐवजी ‘अंजली’ असे चुकीचे लिहिले गेले. नऊ वर्षांपासून अद्यापपर्यंतही नावातील दुरूस्ती करण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखवले नाही. प्रशासनाच्या या चुकीमुळे शिक्षकास नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची गंभीरबाब उघडकीस आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सिसा येथील कुळसेंगे रहिवाशी आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील असलेल्या या शिक्षकास २०१० मध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणावर शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर शिक्षका पात्रतेस आवश्यक असलेले ‘डिएड’ ही शिक्षणही पूर्ण केले. पण तत्काली या शिक्षकास ठाणे जिल्हा परिषदेने दिलेल्या नियुक्त आदेशावर त्यांचे नाव अण्णाजी ऐवजी अंजली असे नमुद केले. या चुकीच्या नावावर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागानेही त्यांना हजर करून घेतले. त्यानंतर नावात दुरूस्ती करण्याच्या कामासाठी कुळसेंगे तब्बल नऊ वर्षांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मुख्यालयात फेऱ्या मारत आहेत. नियुक्ती आदेशातील चुकीच्या नावा ऐवेजी ‘अण्णाजी’ अशी दुरूस्ती करण्याऐवजी चौकशी लावून वेतन थांबवण्याची भीती प्रशासनाकडून दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. या मनमानीमुळे कुळसेंगे यांना तीव्र मनस्तापास तोंड द्यावे लागत आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या झरी धांगडपाडा ता. तलासरी येथे कुळसेंगे शिक्षक पदी कार्यरत आहे.तत्काली ठाणे जिल्हह्यातच तलासरी तालुका समाविष्ठ होता. जिल्हा विभाजनानंतर पालघर जिल्ह्यात या तालुक्याचा समावेश झाला. पण नावातील दुरूस्तीसाठी सतत नऊ वर्षांपासून फेºया मारणाºया कुळसेंगे यांना आता जिल्हा विभाजनामुळे ठाणे जिल्हा परिषदेतून मुळे नियुक्ती आदेशातील दुरूस्तील विलंब होत आहे. अंजली ऐवजी मी ‘अण्णाजी’ असल्याचे सर्व कागदपत्रे ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द केले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांच्या मुळच्या गावच्या ग्राम पंचायतींने देखील शिफारस केली आहे. मात्र शालेय कागदपत्रे, डिएड प्रमाणपत्र आदी सर्व कागदपत्र सुपूर्द करूनही कुळसेंगे यांच्या नावात दुरूस्ती करून देण्यास प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून मनमानी टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव जिल्हा परिषदेच्या सदस्या वृषाली विलास शेवळे यांनी सर्वसाधारण सभेच्या निदर्शनात आणून दिले आहे.गडचिरोलीच्या नक्षली भागातील हा शिक्षक आपल्याकडे स्वाभिमानाने जीवन जगत आहे. चुकी नसतानाही या शिक्षकाचे नाव ‘अंजली’ असे महिलेचे नाव नियुक्ती आदेशात नमुद केले आहे. त्यास मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात प्रशासन त्यांची चौबाजुने आडवणूक करीत आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे व संतापातून या शिक्षकाचे बरेवाईट होऊ शकते, मनस्तापातून ते नक्षलग्रस्त होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही, आदी मुद्यांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चाही झाली आहे. मात्र अजूनही कुळसेंगे, यांच्या नियुक्ती आदेशातून चूक दुरूस्त करून अण्णाजी असे करून मिळालेले नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील मनमानी व अनागोदी कारभारा संदर्भात तर्कवितर्क काढले जात असून जिल्हा परिषद प्रशासन आता कुळेसेंगे यांना काय न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अण्णाजी ऐवजी 'अंजली' नावाने शिक्षकाला नियुक्ती आदेश; दुरूस्तीसाठीही अडवणूक
By सुरेश लोखंडे | Published: June 22, 2019 7:50 PM
गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सिसा येथील कुळसेंगे रहिवाशी आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील असलेल्या या शिक्षकास २०१० मध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणावर शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर शिक्षका पात्रतेस आवश्यक असलेले ‘डिएड’ ही शिक्षणही पूर्ण केले
ठळक मुद्देविदर्भाच्या नक्षलग्रस्त भागात राहून कष्ठाने शिक्षणशिक्षकाचे नाव ‘अंजली’ असे महिलेचे नाव नियुक्ती आदेशातत्यात प्रशासन त्यांची चौबाजुने आडवणूक