ठाणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन आज तब्बल सहा वर्ष उलटले, पण पोलिसांकडून अजूनही खुनी व मुख्य सूत्रधारांना पकडण्यात आले नाही. याचा निषेध करीत अंध्दश्रध्द निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी शहरात निर्भय प्रभात फेरी काढून शासनाच्या निष्काळी व दुर्लक्षितपणाचाही जाहरी निषेध केला.येथील कोर्ट नाका येथून भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरतळ्यास अभिवादन करूनही ही निर्भय प्रभात फेरी टेंभी नाका, जांभळी नाका येथून तलावपाली आणि महात्मा गांधी उद्यानातील गांधीजींच्या पुतळ्या अभिवादन करून या कार्यकर्त्यांनी ही निर्भय प्रभात फेरीचे विसर्जीत केली. यानंतर या प्रभात फेरीच्या शिष्टमंडळाने दुपारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरां खुन्यांना व मुख्य सूत्रधारास तत्काळ अटक करण्याची मागणी केली. याशिष्टमंडळामध्ये वंदना शिंदे, सुधीर निंबाळकर, अमोल चौघुले, अशोक चव्हाण आदीं प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता. या निर्भय प्रभात फेरीच्या निमित्ताने येथील एम.एच हायस्कूलमधील ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना वैद्यानिक दृष्टीकोन या विषयावर वंदना शिंदे यांनी सखोल मार्गदर्शन केले............फोटो - विशाल
अंनिसच्या कार्यकर्त्यांची ठाणे शहरात निर्भय रॅली; डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 8:29 PM
येथील कोर्ट नाका येथून भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरतळ्यास अभिवादन करूनही ही निर्भय प्रभात फेरी टेंभी नाका, जांभळी नाका येथून तलावपाली आणि महात्मा गांधी उद्यानातील गांधीजींच्या पुतळ्या अभिवादन करून या कार्यकर्त्यांनी ही निर्भय प्रभात फेरी
ठळक मुद्देडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन आज तब्बल सहा वर्ष उलटले,खुनी व मुख्य सूत्रधारांना पकडण्यात आले नाहीडॉ. नरेंद्र दाभोलकरां खुन्यांना व मुख्य सूत्रधारास तत्काळ अटक करण्याची मागणी