शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

...आणि अनयाचा वाढदिवस अखेरचा ठरला

By admin | Published: August 05, 2015 1:35 AM

कृष्णा निवासमध्ये राहणाऱ्या अनया (७) हिचा सोमवारी एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करून पुन्हा त्याच आनंदात घरी परतून गाढ झोपेत असलेल्या

ठाणे : कृष्णा निवासमध्ये राहणाऱ्या अनया (७) हिचा सोमवारी एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करून पुन्हा त्याच आनंदात घरी परतून गाढ झोपेत असलेल्या अरुण सावंत यांच्या कुटुंबावर मृत्यूने घाला घातला. काही कळायच्या आत ही इमारत कोसळली आणि झोपेतच या कुटुंबातील चार जणांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. यामध्ये अनयालासुद्धा मृत्यूने कवटाळले. या इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले रामचंद्र भट हे त्यांची पत्नी मीरा, मुलगी रश्मी, रुचिता आणि भाऊ सुब्बाराव यांच्यासोबत राहत होते. त्यांची मोठी मुलगी रश्मी हिचा दोन महिन्यांपूर्वीच ४ जूनला वर्तकनगर येथे राहणाऱ्या करण मांगे याच्याबरोबर विवाह झाला होता. तो दुबईत नोकरी करीत असल्याने ते दोघेही तिथेच राहत होते. अवघ्या चार दिवसांपूर्वी ती दुबईहून ठाण्यात आली होती. त्यानंतर करण हा कामासाठी गुजरातला गेला होता. रश्मी ही तिच्या सासरीच राहत होती. तर तिसऱ्या मजल्यावर अरु ण दत्तात्रय सावंत (६२) हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते लोढा कॉम्प्लेक्स येथे राहायला गेले होते. परंतु ते वर्षभरापूर्वीच पुन्हा येथे राहण्याा आले होते. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी भक्ती, नात अनया आणि जावई अमित खोत हे राहत होते. तर त्यांचा मुलगा अमित हा नोकरीसाठी अमेरिकेला होता. दरम्यान, भक्तीची मुलगी अनया हिचा ३ जूनला पाचवा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्याकरिता अमित अमेरिकेहून ठाण्यात आला होता. दरम्यान, रश्मी आणि भक्ती या लहानपणापासूनच्या मैत्रिणी असल्याने अनयाचा वाढदिवस साजरा करण्याकरिता तीसुद्धा वर्तकनगरहून आपल्या माहेरी आली होती. सोमवारी रात्री भट आणि सावंत कुटुंबीय एका हॉटेलमध्ये अनयाचा वाढदिवस साजरा करून घरी परतले होते. त्यानंतर रात्री उशिरा रश्मी आणि तिच्या मावशीचे फोनवर बोलणेही झाले. मात्र रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी ही इमारत पडली आणि या घटनेत संपूर्ण भट कुटुंबीय रश्मीसह मृत्युमुखी पडले, तर सावंत कुटुंबातील अरुण सावंत, मुलगा अमित, मुलगी भक्ती, नात अनया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा जावई अमित खोत हा सुदैवाने या दुर्दैवी घटनेतून बचावला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.