ठाणे : मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडी सेविका २५ एप्रिलपासून केवळ आहार वाटपाचे काम करणार आहेत, उर्वरित निवडणुकीच्या कामांसह योजनांचे व इतर कोणतेही कामे करणार नसल्याचा ईशारा त्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसह प्रधान सचिव आणि एकात्मिक बालविकास आयुक्तांना लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.एकात्मिक बालविकास विभागाच्या नियंत्रणात अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना मार्चपासून अजून ही मानधन मिळालेले नाही. त्या अर्ध्यापोटी काम करीत आहेत. गरीब, कष्ठकरी कुटुंबातील या सेविका, मदतीनस आदी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर होत नाही, मार्च महिन्याचे माधन अजूनही मिळालेले नाही. या मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे, यासाठी त्यांनी लाभार्थ्यांना आहार वाटपा व्यतिरिक्त करावे लागणारे कामे गुरूवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीच्या कामांसह विविध योजनांचे कामे, विविध सभांची भागिदारी, अन्य अहवाल आदी कामे अंगणवाडी सेविका, मदतनीस करणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. याची पूर्व कल्पना मुख्यमंत्री, प्रधानसचिव, आयुक्तांना दिलेली असूनही मार्चचे थकीत मानधन अजून दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.काम बंदचा फटका आहाराच्या लाभार्थ्यांना बसू नये म्हणून सेविका, मदतनीस त्यांचे दैनंदिन आहार वाटपाचे काम सुरू ठेवले आहेत. मात्र मतदानाच्या दोन दिवस आधी व मतदानाच्या दिवशी मतदारांना चिट्टी वाटप करणे, मतदान केद्रांवरील पाळणा घराचे काम, मतदान अधिकारी आदी लोकसभा निवडणुकीचे कामे देखील २९ एप्रिल रोजी कोकणातील सुमारे ६० हजार अंगणवाडी सेविका करणार नाही, असे बृजपालसिंह यांनी सांगितले. या निवडणुकीच्या कामा विरोधात न्यायालयात देखील याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले आहेत. मार्चचे थकीत व एप्रिलचे मानधन १ मे पूर्वी मिळावे, असे ठोस निर्णय घेतल्या शिवाय सेविका, मदतनीस निवडणुकीसह कोणतेही कामे करणार नसल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले आहे. यामुळे लोकसभेच्या मतदान केंद्रांवरील विविध कामांवर त्यांचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीच्या कामास अंगणवाडी सेविकांचा गुरूवारपासून विरोध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 7:46 PM
एकात्मिक बालविकास विभागाच्या नियंत्रणात अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना मार्चपासून अजून ही मानधन मिळालेले नाही. त्या अर्ध्यापोटी काम करीत आहेत. गरीब, कष्ठकरी कुटुंबातील या सेविका, मदतीनस आदी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर होत नाही, मार्च महिन्याचे माधन अजूनही मिळालेले नाही. या मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे, यासाठी त्यांनी लाभार्थ्यांना आहार वाटपा व्यतिरिक्त करावे लागणारे कामे गुरूवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला
ठळक मुद्देकाम बंदचा फटका आहाराच्या लाभार्थ्यांना बसू नये म्हणून सेविका, मदतनीस त्यांचे दैनंदिन आहार वाटपाचे काम सुरूलोकसभा निवडणुकीचे कामे देखील २९ एप्रिल रोजी कोकणातील सुमारे ६० हजार अंगणवाडी सेविका करणार नाहीमार्च महिन्याचे मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे