शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

Mahalaxmi Express : रेल्वे प्रशासनावर संताप तर एनडीआरएफवर स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 23:31 IST

काहींनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

- पंकज पाटीलबदलापूर : तब्बल १४ तासांहून अधिक काळ महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी रेल्वेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अंबरनाथ ते वांगणी या रेल्वेमार्गावर पाणी साचल्याची पूर्वकल्पना असतानाही रेल्वेस्थानकात तासभर उभी केलेली गाडी पुढे का सोडण्यात आली, असा सवाल सुटका झालेले प्रवासी करत होते. गाडीत खानपानाची व्यवस्था नसल्याने त्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. त्याचवेळी अत्यंत कमी कालावधीत एनडीआरएफच्या जवानांनी पुरातून सुखरूप सुटका केल्याने त्यांची आणि मदतीला धावून आलेल्या स्थानिकांची प्रवाशांनी तोंडभरून स्तुती केली.रेल्वे डब्यांत अडकलेल्या प्रवाशांनी सर्वप्रथम आपल्या नातलगांना फोन केले. त्यानंतर, काहींनी रेल्वे पोलीस नियंत्रण कक्ष, रेल्वे पोलीस यांना फोन केले. काहींनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काहींनी रेल्वेमंत्र्यांना टिष्ट्वट करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नांना फारसे यश न आल्याने प्रवासी चिडले.एनडीआरएफची टीम पोहोचल्यावर प्रवाशांच्या जीवात जीव आला. दोन हेलिकॉप्टर त्या परिसरात घिरट्या घालू लागल्याने मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांना जाणवले. सुटका झालेले प्रवासी रेल्वेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत होते. एनडीआरएफ व स्थानिकांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.रुळांवर पाणी साचले आहे, याची कल्पना असतानाही रेल्वेने गाडी पुढे सोडली, हा प्रचंड हलगर्जीपणा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने काही केले नाही. गाडीत खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याने हाल झाले. रेल्वेचे बेजबाबदार वर्तन निषेधार्ह आहे.- संदीप शिंदे, परळ, मुंबईकोल्हापूरला दोनदिवसीय साहित्य संमेलन असल्याने मी व माझे सहकारी महालक्ष्मीने निघालो होतो. मात्र, ही गाडी कल्याणनंतर संथगतीने जात होती. अंबरनाथ स्थानकाजवळ गाडी दोन तास थांबवण्यात आली होती. गाडी पुढे जाऊ शकत नाही, याची कल्पना होती, तर ती पुढे सोडून शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे काम रेल्वेने का केले?- प्रतीक धनावडे, ठाणेकोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मी जात होते. सुरुवातीपासूनच गाडी पुढे जाणार की नाही, अशी परिस्थिती होती. रात्रीच्या अंधारात गाडी अनेक ठिकाणी थांबत होती. अंबरनाथ स्थानकातही दोन तास गाडी थांबली. मात्र, बदलापूर स्थानक सोडल्यावर गाडी जी थांबली, ती पुढे सरकलीच नाही. त्यामुळे प्रवाशांना आहे, त्या स्थितीतच राहावे लागले. गाडी अडकल्यावर रेल्वेने सुरुवातीला मदत पाठवणे गरजेचे होते. मात्र, कोणतीच मदत रेल्वेकडून आली नाही. एनडीआरएफच्या टीममुळे आम्ही आज सुखरूप आहोत.- रुचा घायवट, टिटवाळारेल्वेला प्रवाशांची कोणतीच चिंता नाही, हे सिद्ध झाले आहे. प्रवाशांचा जीव टांगणीला लावून रेल्वेने आपली बेपर्वाई दाखवली आहे. गाडीच्या आत पाणी येत असतानाही कोणतीच मदत आली नाही. पाण्यासोबत डब्यात साप आल्याने सर्वांच्या मनात भीती बसली. अवघड परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आमच्यावर आली. या प्रकारानंतर किमान रेल्वेने प्रवाशांच्या जीवितासोबत खेळू नये.- आशा भरोडे, मुंबईमुलगा आणि सुनेला भेटण्यासाठी आम्ही डोंबिवलीला आलो होतो. रात्रीची गाडी पकडल्यावर रात्रभर गाडीत आराम करून सकाळी कोल्हापूरला उतरणार होतो. मात्र, गाडीच पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने आमचा जीव टांगणीला लागला होता. रात्र अत्यंत वाईट गेली. कोणतीच मदत आम्हाला रेल्वेकडून मिळाली नाही. सकाळी स्थानिकांकडून आणि बचाव पथकाकडूनच मदत मिळाली.- सुरेश जोशी, मिरजआधीच आजारपण, दम्याचा प्रचंड त्रास, त्यात गाडी अडकल्याने जीव टांगणीला लागला होता. आता जीव जातोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. बचाव पथकाने बाहेर काढले. मात्र, बाहेर काढल्यानंतर डोंगर ओलांडून गावात जाण्याची ताकद नव्हती. अर्ध्यावरच बसून राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, ग्रामस्थांनी मदत केल्याने खाली सुखरूप आले.- शोभा पवार, कोल्हापूर

टॅग्स :Mahalaxmi Expressमहालक्ष्मी एक्सप्रेस