शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरण: संतप्त पालकांचा बदलापुरात 'रेल रोको', लोकल सेवा ठप्प!

By पंकज पाटील | Published: August 20, 2024 10:50 AM

या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

बदलापूर: बदलापुरातील आदर्श महाविद्यालयात ज्या दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाला त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पालकांनी सकाळी दहा वाजता रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.आदर्श महाविद्यालयातील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आज सकाळी साडेसहा वाजता सर्व पालकांनी आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करून पोलीस प्रशासनाला चांगलाच घाम फोडला होता. मात्र संतप्त झालेल्या पालकांनी महाविद्यालयाच्या आंदोलनाच्या ठिकाणी काढता पाय घेत रेल्वे स्थानक गाठत बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केले. डाऊन मार्गावरील कोयना एक्सप्रेस या सर्व संतप्त आंदोलन कर्त्यांनी रोखून धरली.

पालकांचा मोठा समूह थेट रेल्वे रुळावर आल्याने रेल्वे प्रशासन देखील सतर्क झाली आहे. पालकांचा संताप अनावर होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रेल रोको मुळे अप मार्गावरील रेल्वे वाहतूक वांगणी स्थानकापर्यंत थांबवण्यात आली आहे तर डाऊन दिशेकडील रेल्वे सेवा अंबरनाथ स्थानकात थांबवण्यात आली आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरrailwayरेल्वेSchoolशाळाStudentविद्यार्थी