लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठाणे व नवी मुंबई परिसरातील कार्यकर्त्यांकरिता तीन दिवसांच्या ऑनलाइन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवारी शिबिराच्या पहिल्या दिवशी ‘वेळीच ओळखा बुवाबाजीचा विळखा’ या विषयावर प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रमाणेच रविवार १ ऑगस्ट रोजी‘ अंनिस म्हणजे काय हो साथी?’ या विषयावर परेश काठे मार्गदर्शन करणार आहेत, तर सोमवार २ ऑगस्टला ‘चला समजून घेऊ या अंनिसचे विविध उपक्रम’ या विषयावर निमा शिंगारे व अशोक निकम मार्गदर्शन करतील. या शिबिरात सामील होण्यासाठी इच्छुकांनी शिबिराच्या ऑनलाइन लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
.........
वाचली