शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

ठाण्यातील सिद्धी गुप्ताच्या नातेवाईकांना महावितरणकडून अखेर पाच लाखांची मदत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 9:32 PM

सिद्दी गुप्ताचा वीजेच्या धक्क्यामुळे रविवारी मृत्यु ओढवला. शिवसेनेसह परिसरातील रहिवाशांनी नुकसानभरपाईची मागणी केल्यानंतर तिच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत देण्याचे महावितरणच्या अधिका-यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देदोषी अधिकाऱ्यांवरही होणार निलंबनाची कारवाईविजेच्या धक्क्याने रविवारी झाला होता मृत्युलोकमत इफेक्ट

ठाणे : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे लोकमान्यनगर येथील मृत पावलेल्या सिद्दी गुप्ता (७) या मुलीच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत देण्याबरोबरच यातील दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणच्या ठाण्यातील अधिका-यांनी दिले. ओवळा माजीवडयाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह स्थानिक रहिवाशांच्या मागणीनंतर त्यांनी हे आश्वासन दिले.टेमकर चाळीतील तिसरी मध्ये शिकणा-या सिद्धी हिला रविवारी महावितरणच्या उघडया वाहिन्यांमुळे वीजेचा धक्का बसला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु ओढवला. ‘महावितरणच्या हलगर्जीमुळे ठाण्यामध्ये चिमुकलीचा मृत्यु’ या मथळयाखाली ‘लोकमत’ हॅलो ठाणेच्या ४ एप्रिलच्या अंकात याबाबतचे सविस्तर वृत्तही प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, बुधवारी महावितरणच्या या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज महावितरणच्या सावरकरनगर येथील कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच या मुलीच्या पालकांना पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याची तसेच संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत महावितरणचे ठाणे मंडळ अधीक्षक अभियंता संतोष वहाणे आणि वागळे इस्टेट विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चौधरी यांनी सिद्धीच्या पालकांना एक महिन्याच्या आत पाच लाखांची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच संबंधित दोषी कर्मचारी अधिका-यांवरही कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने गेल्या अनेक वर्षापासून लोकमान्यनगर परिसरातील उघडया अवस्थेतील वीज वाहिन्या तसेच वाहतूकीला अडथळा ठरणारे जुने गंजलेले विद्युत पोल्स हटविण्यात यावेत, अशी मागणीही सरनाईक यांनी केलेली आहे. या मागणीलाही महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला. त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शॉक प्रूफ विद्युत बॉक्स या परिसरात बसवून जुने विद्युत पोल हटवावेत. तसेच महापालिकेकडे मागणी करून उपलब्ध जागेत भूमिगत केबल सह चांगल्या प्रतीचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत, झोपडयांवरुन गेलेल्या विद्युत वाहिन्या दुर्घटना होणार नाहीत, अशा ठिकाणी स्थलांतरीत कराव्यात, नवीन सदोष वीज मीटरची तपासणी करून मगच योग्य वीज बिले नागरिकांना पाठवावीत, आदी मागण्यांचेही निवेदन सरनाईक यांनी यावेळी दिले. यातील बहुतांश मागण्याही महावितरणने तात्काळ मान्य केल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.यावेळी युवसेना सचिव नगरसेवक पूर्वेश सरनाईक, दिलीप बारटक्के, नगरसेविका आशा डोंगरे, कांचन चिंदरकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय नलावडे, विभागप्रमुख रामचंद्र गुरव, उपशहर संघटक भाई खाडे, युवसेना समन्वयक संदिप डोंगरे तसेच शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाDeathमृत्यू