ठाणे - ठाणे महानगरपालिका हद्दीतील ६० वर्षांवरील एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या ६ हजार ६३८ महिलांना उधरनिर्वाहासाठी वार्षिक १८ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. सुरवातीला केवळ ६३० लाभार्थी अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु आलेल्या अर्जांची संख्या ही १२ हजार ५०० एवढी होती. त्यामुळे यातून मार्ग काढत यातील पात्र ठरेलेल्या जेष्ठ नागरीक महिलाना आता हे उदरनिर्वाहाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध योजने अंतर्गत महिलांना आणि दिव्यांगांना अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे. या वर्षी ज्येष्ठ नागरीक महिलांनाही उदरनिर्वाहासाठी अनुदान देण्याची योजना आखली होती. परंतू त्याचे उद्दीष्ट फक्त ६३० लाभार्थ्यांपर्यंत मर्यादीत ठेवण्यात आले होते व त्यासाठी १ काटी १० हजार रु पयांची तरतूद करण्यात आली होती. परंतू योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला. सर्व प्रभाग समितीवर ज्येष्ठ नागरिक महिलांनी रांगा लावून अर्ज भरले. उद्दीष्ट फक्त ६३० इतकेच असल्याने ज्येष्ठ नागरिक महिलांमध्ये नाराजी पसरु न उद्दीष्ट वाढविण्याची मागणी होऊ लागली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक महिलांना सगळयांनाच वार्षिक उदरिनर्वाह भत्ता दयावा अशी मागणी महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राधीका फाटक यांनी केली होती. त्यानुसार १२ हजार ५०० अर्ज वितरीत झाले होते परंतू उदरिनर्वाह भत्ता मिळण्यास पात्र ६ हजार ६३८ अर्ज ठरले होते. त्यानुसार आता पात्र ठरलेल्या ६ हजार ६३८ ज्येष्ठ नागरिक महिलांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ११ कोटी ९६ लाख ८४ हजार रुपयांचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.
महापालिका हद्दीतील ६६३८ जेष्ठ नागरीक महिलांना उदरनिर्वाहासाठी मिळणार वार्षिक १८ हजारांचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 5:29 PM
ठाणे महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने यंदा पहिल्याच वर्षी जेष्ठ नागरीक महिलांसाठी देण्यात येणाऱ्या पात्र ठरणाºया लाभार्थ्यांची संख्या वाढविली आहे. त्यानुसार आता ६६३८ महिलांना वार्षिक १८ हजारांचे अनुदान मिळणार आहे.
ठळक मुद्देमहापालिकेवर पडणार ११ कोटी ९६ लाखांचा बोजालाभार्थ्यांची संख्या वाढली