लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भिवंडीमध्ये मिळालेल्या १२ हजार जिलेटीनच्या कांडया आणि मोठया संख्येने हस्तगत केलेले डेटोनेटर या स्फोटकांच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी अमोल वाल्मिक जोंधळे (रा.कवठेकमलेश्वर ता.संगमनेर जि अहमदनगर ) या आणखी एका आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यालाही २२ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.युनिट एकचे पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव आदींच्या पथकाने तब्बल दोन लाखांचा स्फोटकांचा साठा गुरुनाथ म्हात्रे याच्या कारीवलीतील मित्तल इंटरप्रायजेसच्या कार्यालयातून १७ मे रोजी दुपारी धाड टाकून जप्त केला. या कारवाई पाठोपाठ याच पथकाने संगमनेर येथून ही स्फोटके बेकायदेशीरपणे विकणाऱ्या जोंधळे याचीही १८ मे २०२१ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास धरपकड केली. सखोल चौकशीमध्ये त्याचाही या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळले आहे. संगमनेर येथेच या स्फोटकांचा कारखाना असून यात आणखी कोणी सहभागी आहे किंवा कसे? याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भिवंडीच्या जिलेटीन आणि डिटोनेटर स्फोटक प्रकरणात संगमनेर येथून आणखी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:58 PM
भिवंडीमध्ये मिळालेल्या १२ हजार जिलेटीनच्या कांडया आणि मोठया संख्येने हस्तगत केलेले डेटोनेटर या स्फोटकांच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी अमोल वाल्मिक जोंधळे (रा.कवठेकमलेश्वर ता.संगमनेर जि अहमदनगर ) या आणखी एका आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने मंगळवारी रात्री अटक केली आहे.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई आतापर्यंत दोघांना अटक