कसारा : शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कसारा घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सुरू आहेत. आज संध्याकाळी 4:45 वाजता नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर हा कंटेनर नादुरुस्त असल्याने उभा होता. त्याच दरम्यान मागून एक भरधाव वेगात येणार कंटेनर चालकाचा ताबा सुटला उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. या अपघातात दुरुस्तीचे काम करणारा मेकॅनिक याच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
सभरसिंग राठी, मोहमद इर्शाद व अन्य एक जण गंभीर जखमी झाले. त्यांना खर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्यांनी काही वाहनचालकांच्या मदतीने अडकलेल्या चालकास बाहेर काढले. सर्व जखमींना नॅशनल हायवेच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.