लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मोबाईल चोरी प्रकरणात ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील राहूल वल्हाद्रा (२५) या आणखी एका पेशंट केअर टेकरला (पीसी) कापूरबावडी पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याच्याकडून एक मोबाईलही हस्तगत केला आहे. यापूर्वीही दीपक सावंत या पीसीला अशाच एका गुन्हयात पोलिसांनी अटक केली आहे.भिवंडीतील कशेळी भागात राहणारे सागर धाकडे (३०) यांचे मेव्हणे ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात कोविडवरील उपचारासाठी दाखल होते. त्यांच्यावर १७ एप्रिल ते १९ एप्रिल २०२१ या काळात या रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला त्यावेळी त्यांचा दहा हजारांचा मोबाईल गहाळ झालेला होता. बराच शोध घेऊनही मोबाईल न मिळाल्याने अखेर सागर धाकडे यांनी मोबाईल चोरीची तक्रार १३ जून रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, उपनिरीक्षक संजय पाटील आणि हवालदार शरद खोडे आदींच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एक पीसी राहूल यालाही अटक केली. त्याला १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मोबाईल चोरी प्रकरणात ग्लोबलच्या आणखी एका पेशंट केअरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 7:36 PM
मोबाईल चोरी प्रकरणात ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील राहूल वल्हाद्रा (२५) या आणखी एका पेशंट केअर टेकरला (पीसी) कापूरबावडी पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.
ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कारवाईएक मोबाईल हस्तगत