मीरारोड - भाईंदर पूर्वीच्या रेल्वे स्थानक समोर असलेल्या इना पॅलेस उर्फ कॅपिटल लॉजिंग अँड बोर्डिंग मधून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे पोलिसांच्या धाडी उघडकीस आले आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात ८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा भाईंदर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव व त्यांच्या पथकाने कॅपिटल लॉजिंग वर धाड टाकली. सदर धाडीत लॉजमधून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे उघडकीस आले. लॉजचा व्यवस्थापक अरुण देवप्पा सालियन ह्याने वेश्याव्यवसायसाठीची रक्कम स्वीकारली . याप्रकरणी अरुण सालियन ( वय ५० ) सह वेटर सुरेंद्र फरियाप्रसाद यादव ( वय ५० ) , आरमा दोराई नाडार (वय ४८ ) , उदय पुजारी, दिनेश पुजारी, किशोर यादव व रोहित उर्फ आशिष यादव तसेच चालक रविकांत शिवन्ना शेट्टी हे आरोपी आहेत . ह्यातील सालियन सुरेंदर यादव व नाडर ह्या तिघांना अटक करण्यात आली आहे . याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय केदारे पुढील तपास करत आहेत