ठाणे : काँग्रेस चे नेते राहुल गांधी निरव मोदी, ललित मोदी यांच्या विरोधात काय चुकीचे बोले आहेत, ते डाकू चोर नसतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. अदानी आणि मोदी यांचे नाते काय, निरव मोदी आणि मोदी यांचे नाते काय याचे उत्तर द्यावे असे सवाल काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राहुल गांधी यांच्या विरोधात जो न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याचा जाब लोकशाही मार्गने आंदोलनाच्या माध्यमातून विचारला जाईल असेही त्यांनी स्पष्ट करीत न्याय व्यवस्थेवर सरकारचा दबाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ठाण्यात आज काँग्रेसच्या वतीने विविध विभाग व सेलच्या एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी हा आरोप केला. निवडणूक आयोगाने सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील असे सांगितले आहे. यावर नाना पटोले म्हणाले, दीड वर्ष होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या नाहीत ठाण्याची परिस्थिती काय झालेली आहे हे यावरून दिसत आहे, प्रशासक आणि राज्यकर्त्यांच्या माध्यमातून केवळ लूट सुरू आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आता लोकशाहीला न म्हणणारे सरकार आहे त्यामुळे काहीही होऊ शकते आधी ईडी सरकार होते आता तीन तिघाडा सरकार आहे त्यामुळे त्यांना निवडणुका पाहिजे की नाही हा एक प्रश्न आहे. त्यातही निवडणूक लागल्या तर त्याचे आम्ही स्वागतच करू. 10 ऑगस्ट पूर्वी विधानसभा अध्यक्षांना शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांबाबत अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल. त्यांनी जर निर्णय दिला नाही तर मात्र सुप्रीम कोर्टही त्याबाबत निर्णय देऊ शकतो त्यामुळे ते निश्चितच अपात्र होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोज भरती केली जात आहे, जनेतची देखील जीएसटी आणि विविध करांच्या माध्यमातून लूट केली जात आहे. त्यामुळे हे डाकू आणि लूट करणारे सरकार असून ते सत्तेची मजा घेण्याचे काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राहुल गांधी यांचे अपील फेटाळल्याने नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहा खालील रस्त्यावर निषेध आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्नही नाना पटोले यांनी केला.