उल्हासनगर : कॅम्प नं-१, शहाड गावठाण येथील सेच्युरी रेयॉन रुग्णालय ट्रस्टच्या अंर्तगत प्रसुतीपुर्व क्लिनिक सुरु करण्यात आले असुन क्लिनिकचे उदघाटन गुरवारी दुपारी जेष्ट समाजसेविका संतोष चितलांगे यांच्या हस्ते करण्यात आले. रुग्णालयात गर्भसंस्कार कार्यशाळेचे आयोजन केले असून अनेकांनी कार्यशाळेत भाग घेतला.
उल्हासनगरातील रेयॉन संच्युरी हॉस्पिटल विविध उपक्रम राबवित असून रुग्णालयात प्रसूतीपूर्व क्लिनिक सुरू करण्यात आले. क्लिनिक मध्ये गर्भसंस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गरोदर महीलांची प्रसुतीपुर्व तपासणी, तज्ञ डॉक्टरकडुन आहाराविषयी सल्ला, आई आणि मुल सुद्रुढ आणी सुरक्षित राहावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन हे प्रसुतीपुर्व क्लीनिक सुरु करण्यात आल्याची माहिती जेष्ट समाजसेविका संतोष चितलांगे यांनी गुरवारी शहाड येथील सेच्युरी रेयॉन हाऊसपिटल येथे गर्भसंस्कार कार्यशाळेच्या उग्घाटन प्रसंगी दिली. याप्रसंगी संच्युरी कंपनीचे युनिट हेड दिग्विजय पांडे, श्रीकांत गोरे, योगेश शहा, सरोज पांडे, लीना गोरे यांच्यासह महीला प्रगती मंडळाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. अशी माहिती सेच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली आहे.