ठाणे : कोरोना काळात नागरिकांच्या गरजांकडे लक्ष देताना भटक्या कुञ्यांच्या लसीकरणाकडेही मनसेने विशेष लक्ष दिले आहे. पाॅज या प्राणीमिञ संस्थेच्या मदतीने ठाण्यातील ५० हून अधिक भटक्या कुञ्यांना अँटी रेबिज लस देण्यात आली. यावेळी राञीच्या अंधारात कार अथवा दुचाकीच्या धडकेत कुञे जायबंदी होऊ शकतात. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी या कुञ्यांच्या गळ्यात रेडिअम बेल्टही घालण्यात आले.
रस्त्यावरील रेबीज आजार झालेला कुत्रा एखाद्या व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीचा रेबीजने मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या कुत्र्यांना 'अँण्टी रेबीज लस' देण्याचा उपक्रम 'पॉज' या प्राणीमित्र संस्थेच्या मदतीने ठाण्याच्या पोखरण रोड क्रमांक दोन, लोकपुरम भागात घेण्यात आला. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. यावेळी 'पाॅज'चे संस्थापक निलेश भणगे व त्यांच्या टीमने कुञ्यांचे लसीकरण करतानाच त्यांच्या गळ्यात रेडिअमचे पट्टे घातले. या अशा चमकणार्या पट्टयांमुळे भटके कुञे गाडीसमोर येऊन होणारे अपघात टळतील, असे मत मनसे प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी व्यक्त केले.--------------------------------------------------पशु पक्ष्यांना अनोखी मेजवानीमनसे नेते अमित ठाकरे यांचे प्राणीप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे ठाण्याच्या कोकणीपाडा भागात असलेल्या डब्ल्यूडब्ल्यूए संस्थेच्या पशुपक्षींच्या रेस्क्यू सेंटरमध्ये जात येथील माकड, पोपट, गरुड, घुबड, मांजर, कासव आदींना त्यांच्या आवडीच्या पदार्थांची महाराष्ट्र सैनिकांनी मेजवानी दिली.