- सुरेश लोखंडेठाणे : दरमहा सुमारे ३५ किलो अन्नधान्य मिळणाºया अंत्योदय कार्डधारकांना वर्षअखेर धान्यास मुकावे लागणार आहे. यामध्ये महापालिकांसह ग्रामीण भागातील सुमारे २२ हजार ५५६ कार्डधारकांना झळ बसणार आहे. मात्र, दिवाळीसाठी जिल्ह्यात मुबलक अन्नधान्य असून नोव्हेंबरचा नियतव्ययदेखील मंजूर झालेला आहे.प्रधान सचिवांच्या आदेशान्वये ठाणे जिल्ह्यातील २२ हजार ५५६ अंत्योदय कार्डधारक त्यांच्या हक्काच्या ३५ किलो धान्यास मुकणार आहेत.यामध्ये १७ किलो गहू, तर १८ किलो तांदळाचा समावेश आहे. याविरोधात सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले. या जिल्ह्यातील किती कुटुंबांना फटका बसणार, याविषयी लोकमतने शोध घेतला असता सुमारे २२ हजार ५५६ कुटुंबे या सवलतीच्या धान्यास मुकणार असल्याचे निदर्शनात आले आहे.या धान्याऐवजी केवळ पाच किलो अन्नधान्य या अंत्योदय कार्डधारकांना मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी कदाचित नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबरच्या आदेशान्वये या कार्डधारकांचा समावेश प्राधान्य गटातील कार्डधारकांमध्ये होऊन त्यांना पाच किलो धान्य मिळणार आहे.मात्र, आजमितीस तरी नोव्हेंबर महिन्यांचा सुमारे सात हजार ८९४ क्विंटलचा अन्नधान्याचा कोठा (नियतव्यय) मंजूर झाला आहे. या अन्नधान्यापैकी महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील १३ शिधावाटप कार्यालयातील दुकानावर चार हजार ८३२ क्विंटल धान्याचा पुरवठा होणार आहे. तर, ग्रामीण भागातील आठ हजार ७५० अंत्योदय कार्डधारकांचे सुमारे तीन हजार ६४ क्विंटल ६० किलो धान्याचा पुरवठा त्यांच्या शिधावाटप दुकानावर १ नोव्हेंबरपासून होणार आहे.अंत्योदय कार्डधारक व बेघर कुटुंबांचा हा ३५ किलो धान्याचा पुरवठा बंद होण्याच्या दृष्टीने अध्यादेश जारी झाले आहेत. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर या महापालिका व अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमधील १३ हजार ८०६ अंत्योदय कार्डधारकांना ३५ ऐवजी केवळ पाच किलो अन्नधान्य मिळणार असल्याचे येथील शिधावाटप कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तर, ग्रामीण भागातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या पाच तालुक्यांमधील आठ हजार ७५० कार्डधारक ३५ किलो या सवलतीच्या धान्याला मुकणार आहेत.
अंत्योदय कार्डधारक धान्यास मुकणार , २२,५५६ लाभधारक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 6:36 AM