शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

कोणीही असा, शस्त्र बाहेर ठेवूनच पोलिस ठाण्यात मिळणार प्रवेश

By जितेंद्र कालेकर | Published: February 07, 2024 10:03 AM

गोळीबारानंतर पोलिसांचा सावध पवित्रा

जितेंद्र कालेकरठाणे : लोकमत न्यूज नेटवर्क पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांना कोणतेही शस्त्र बाळगून प्रवेश न देण्याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश ठाणे पोलिसांनी दिले आहेत. वाद सुरू असलेले दोन गट एकाच वेळी पोलिस ठाण्यात येतात. त्यावेळी तर कुणी शस्त्रासोबत पोलिस ठाण्यात प्रवेश करीत नाही ना, याची विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने 'लोकमत'ला दिली.

उल्हासनगरातील हिल लाइन पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याने ठाणे पोलिस यंत्रणाही अधिक सतर्क झाली. आमदार गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याने ठाण्याची पोलिस यंत्रणा आणि राज्य राजकारण ढवळून निघाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षकांच्या गोळीबाराच्या समाजमाध्यमांसह केबिनमध्येच घटनेमुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. पोलिस ठाण्यातच एखादा राजकीय नेता सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी पोलिस ठाण्यात जाण्यात काय अर्थ आहे? अशा भावना समाजमाध्यमांमधून व्यक्त होत आहे. अनेक वेळा पोलिस ठाण्यात नेते आणि लोकप्रतिनिधी, तसेच त्यांचे समर्थक व इतर प्रतिष्ठित नागरिक थेट प्रवेश करतात. अनेक वेळा त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूलही असते. खबरदारी घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनीच अशा शस्त्रधारींना प्रवेश देण्यास अटकाव करण्याची कसोशीने अंमलबजावणी करावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरFiringगोळीबार