शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

वाहतूकीचे नियोजन केल्याखेरीज ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 5:51 PM

वाहतूकीचे नियोजन आणि पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ करण्यात येऊ नये असे पत्र फ प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी कल्याण-डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहे. तीच रीओढत स्थानिक नगरसेविका खुशबु चौधरी यांनीही विरोध दर्शवला आहे.

ठळक मुद्दे नगरसेविका खुशबु चौधरींचा विरोध  सभापती साई शेलार यांचेही आयुक्तांना पत्र

डोंबिवली: वाहतूकीचे नियोजन आणि पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ करण्यात येऊ नये असे पत्र फ प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी कल्याण-डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहे. तीच रीओढत स्थानिक नगरसेविका खुशबु चौधरी यांनीही विरोध दर्शवला आहे.पश्चिमेपेक्षाही तुलनेने पूर्वेला जेथे हा ब्रीज उतरतो त्या ठिकाणी जोशी हायस्कूल नजीक वाहतूक कोंडी होणार असल्याने आधी त्याचे नियोजन कसे असेल याची माहिती द्या. तसेच ठाकुर्ली उड्डाणपूलावरुन अवजड वाहने येणार नाहीत. त्यात प्रामुख्याने रेतीचे डम्पर, गॅस सिलेंडर वाहक ट्रक यांसह अन्य अवजड वाहनांची ये-जा नसावी अशीही भूमिका खुशबू चौधरी यांनी घेतली. जो पर्यंत उड्डाणपूल सुरु झाल्यास नियोजन काय असेल हे स्पष्ट केले जात नाही तोपर्यंत त्याचा शुभारंभ होऊ नये असे त्या म्हणाल्या. या मार्गावरुन स्कूल बसेसचीही ये-जा नको असेही त्या म्हणाल्या.साई शेलार यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हंटले आहे की, उड्डाणपूलाच्या शुभारांनंतर ठाकुर्ली चोळे गावात आधीच अरुंद रस्त्यामुळे होणा-या वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनासोबत महापालिकेने चर्चा करावी, आणि बाराबंगला ते शेलार चौक हा मार्ग सुरु करावा. जेणेकरुन कोंडी फुटण्यास मदत मिळेल. त्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय पूल सुरु करणे म्हणजे ठाकुर्लीवासियांचे स्वास्थ हिरावून घेण्यासारखे होईल. आधीच पादचा-यांना चालतांना अनेक अडथळे येतात, त्यात हा पूल सुरु झाल्यावर हजारोंनी दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टेम्पो आदींसह अन्य वाहनांमध्ये वाढ होणार आहे. त्याचे नेमके नियोजन करण्यात यावे आणि मगच पूलाचा शुभारंभ करण्यात यावा असे ते म्हणाले. या आधीच याच कारणांवरुन माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनीही या उड्डाणपूलास विरोध दर्शवल्याचे सर्वश्रुत आहे. महापालिकेच्या अभियंत्यांसह ज्या लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला, घाईत भूमीपूनन केले त्या सगळयांनी भविष्यात उद्भवणा-या समस्यांबद्दल काहीच विचार का केला नाही अशी टिका स्थानिकांमधून होत आहे.

टॅग्स :thakurliठाकुर्लीdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका