शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

तांत्रिक अडचण आल्यास आॅफलाइन अर्ज घ्या

By admin | Published: April 29, 2017 1:31 AM

मीरा-भार्इंदर पालिकेने नवीन नळजोडणीसाठी आॅनलाइन अर्ज मागवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा ठराव सोमवारच्या स्थायीच्या बैठकीत सादर केला होता.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेने नवीन नळजोडणीसाठी आॅनलाइन अर्ज मागवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा ठराव सोमवारच्या स्थायीच्या बैठकीत सादर केला होता. त्यावर स्थायीने आॅनलाइन प्रक्रियेला पसंती देत तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास आॅफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली. ज्या आस्थापना व गृहसंकुलांनी बेकायदा नळजोडण्या घेतल्या आहेत, त्यांच्यावर पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनाही नवीन नळजोडणी मोहिमेंतर्गत सामावून घ्यावे. त्यांच्याकडून दंडात्मक शुल्क वसूल करून त्यांच्या नळजोडण्या नियमित कराव्यात. याखेरीज, त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी सूचना स्थायीने प्रशासनाला केली आहे. यावर, प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. पालिकेला एमआयडीसी कोट्यातून ७५ दशलक्ष अतिरिक्त पाणीपुरवठा १५ मे पासून उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी त्यातील २५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा शहराला तातडीने सुरू करण्यासाठी जिल्हा लघुपाटबंधारे विभागाने मान्यता दिल्याने ३० एप्रिलदरम्यान हा पाणीपुरवठा मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी पुरेसे पाणी मिळेल. ज्यांना २०११ पासून नवीन नळजोडणी मिळालेली नाही, त्यांना नवीन नळजोडणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी भोगवटा दाखला व मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम झाल्याची खात्री केल्यानंतरच नवीन नळजोडणीचा लाभ मिळणार आहे. ही मोहीम ३० एप्रिलपासून सुरू होणार असून त्यासाठी आॅनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. (प्रतिनिधी)