कल्याण : एकीकडे सचिवपद कायमस्वरूपी भरण्याकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असताना दुसरीकडे मात्र उशिरा का होईना, उपसचिवपदाच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये उपसचिवपदासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत केडीएमसीतील महिला बाल-कल्याण समिती विभागातील लिपिक किशोर शेळके यांना सर्वाधिक गुण मिळाल्याने ते या पदासाठी पात्र ठरले आहेत. उपसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने २० जूनला होणाऱ्या महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.
२००७ पासून सचिव आणि उपसचिवपदही रिक्त आहे. पहिले उपसचिव सुधीर जोशी यांनी घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीनंतर हे पद आजपर्यंत भरण्यात आलेले नाही. प्रशासन आणि पदाधिकारी यांनी सोयीनुसार सचिवपद प्रभारी ठेवले असताना उपसचिवपदही रिक्तच राहते की काय?, अशी शंका उपस्थित होत होती. २०११ मध्ये उपसचिवपदासाठी परीक्षा आणि मुलाखती घेतल्या होत्या. त्यावेळी पाच उमेदवार रिंगणात होते. परंतु, पुढे त्यांचे काय झाले? याचे कोडे अद्यापपर्यंत उलगडलेले नाही. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रशासनाने उपसचिवपद भरण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याने उपसचिव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.सामान्य प्रशासन विभागाने या पदासाठी १८ डिसेंबर २०१६ ला लेखी परीक्षा घेतली होती. या पदासाठी एकूण १७ उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यातील १४ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यात २०० गुणांच्या लेखी परीक्षेत शेळके यांना सर्वाधिक ११८ गुण मिळाले आहेत. शेळके यांची महापालिकेत २३ वर्षे सेवा झाली आहे.दरम्यान, आयुक्त गोविंद बोडके यांच्या स्वाक्षरीनंतर उपसचिवपद नियुक्तीचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला गेला आहे. त्यामुळे आता महासभा या प्रस्तावावर काय निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सचिवपद भरणार कधी?, नागरिकांचा सवालच्महापालिकेचे पहिले सचिव चंद्रकांत माने हे ३१ डिसेंबर २००७ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर आतापर्यंत सचिवपद भरलेले नाही. सध्या सचिवपदी संजय जाधव यांची प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.च्जाधव यांच्याकडे उद्यान अधीक्षक पदाचाही पदभार आहे. जाधव यांनी अडीच ते तीन वर्षे सचिवपदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे.च्कायद्याचेही त्यांना चांगले ज्ञान असल्याने महासभा नियमानुसार चालविण्यावर त्यांचा विशेष भर असतो. अंतर्गत निवडणुकांची प्रक्रियाही त्यांनी कुशलपणे पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच कायमस्वरूपी सचिवपद द्यावे, अशीही मागणीहोत आहे.च्त्यामुळे उपसचिवपद नियुक्तीनंतर सचिवपद कायमस्वरूपी भरण्याकडे प्रशासन अथवा सत्ताधारी गांभीर्याने लक्ष घालतात का?, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.