सदानंद नाईक, उल्हासनगर :शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर एका प्रकरणात अपहरण,खंडणी आदी १९ गुन्हे दाखल झाल्यावर त्यांनी समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात गेल्या महिन्यात प्रवेश केला. त्यानंतर चौधरी समर्थक सुरेश सोनावणे, संदीप गायकवाड यांची उपशहरप्रमुख पदी तर इतरांची अन्य पदावर जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नियुक्ती केली.
उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी समर्थकासह शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर, खऱ्या अर्थाने शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला. चौधरी यांची जिल्हाप्रमुख पदी निवड होणार असल्याची चर्चा सुरू असताना चौधरी यांच्या समर्थक सुरेश सोनावणे, संदीप गायकवाड यांची उपशहरप्रमुख पदी वर्णी लागली. तर जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे साहेब यांच्या उपस्थित उत्तर भारतीय शहर संघटक पदी के.डी तिवारी, ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख पदी प्रकाश सावकारे, उपशहर प्रमुख (पश्चिम) सुरेश सोनवणे, उपशहर प्रमुख (पुर्व) संदीप गायकवाड, उपशहर संघटक पदी विजय सुपाळे, विभाग प्रमुख कॅम्प नं.२ च्या पदी ज्ञानेश्वर मरसाळे, विभाग प्रमुख कॅम्प नं.३ च्या पदी महेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख पदी विल्सन डिसोजा, उपविभाग प्रमुख कॅम्प नं.१ च्या पदी तुषार बांदल, उपविभाग प्रमुख कॅम्प नं.२ च्या पदी सागर पगारे, उपविभाग प्रमुख कॅम्प नं-३ पदी योगेश काळे, मंगेश पालांडे, उपविभाग प्रमुख कॅम्प नं -५ च्या पदी राकेश चिकणे, उपविभाग संघटक पदी बाळा गवारे , नाना रामा बागुल आदींची नियुक्ती झाली.
शहरातील विविध शाखा प्रमुख पदी जगन अहिरे, जगदीश माळी, नासीर खान, हरेश खेत्रे, संजय देसले, गणेश चौगुल, अशोक अवला, पप्पु जाधव आदींची नियुक्ती जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली. यावेळी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र सिंग भुल्लर महाराज, रमेश चव्हाण, शहर संघटक नाना बागुल आदीजन उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"