उल्हासनगर : शहरातील साथीच्या रोगावरील नियंत्रणासाठी पालिकेने नागरिकांना ड्राय डे चे आवाहन केले असून स्थायी समितीने दीड कोटीच्या जंतुनाशक खरेदीला मंजुरी दिली आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३०, मलेरिया- ६५, स्वाइन फलू-१६ तर व्हायरल तापाच्या रूग्णांची संख्या दोन हजारांवर गेल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडनीस यांनी दिली. उल्हासनगरात या आजारांनी धुमाकूळ घातला असून शिवनेरी, साई आशीष व धन्वंतरी रूग्णालयात डेंग्यूच्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर व्हायरल तापाच्या रूग्णांची संख्या २ हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. आरोग्य विभागाने फवारणी, धुराटणी व मलेरिया आॅइल टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. शहरातील कचरा नियमित उचलला जात नसल्यानेच साथीचे रोग बळावल्याची टीका करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. त्यानंतर उपायुक्त कापडनीस यांनी बडगा उगारताच नियमित कचरा उचलला जात आहे. तसेच कचराकुंड्यांजवळ जंतुनाशक, कीटकनाशके, ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत आहे. ४स्थायी समिती सभापती जया माखिजा यांनी दीड कोटींच्या अळीनाशके व डासनाशके तसेच जंतूनाशके व किटकनाशके तसेच औषध खरेदीला मंजुरी दिली आहे. ४निविदाच्या कचाटयात सापडलेल्या औषध खरेदीला सभापती त्यांनी मंजूरी दिल्याने सभापतीनी अत्यावश्यक कामाच्या नावाखाली कोणत्याही कामालाच मंजुरी न देण्याचा इशारा वजा दम नगरसेवक ओमी कालानी यांनी दिला आहे. ४गैरकारभार चव्हाटयावर येवू नये यासाठीच पत्रकारांना स्थायीच्या बैठकीत बसण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.४शहरवासियांनी आठवडयातून एक दिवस ड्राय डे पाळण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यात टायर, फुलदाण्यांसह फिशटँकमध्ये साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यास सांगितले आहे.
दीड कोटीच्या जंतुनाशक खरेदीला मंजुरी
By admin | Published: September 03, 2015 11:20 PM