- अजित मांडकेठाणे : कळवा खाडीपुलावर तिसऱ्या पुलाचे काम सुरू असताना आता शासनाने विटावा ते कोपरीदरम्यान नव्या खाडीपुलाची उभारणी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून येणारी वाहतूक आता थेट या नव्या पुलामुळे कोपरी पूर्वेतून ईस्टर्न एक्स्प्रेसवर जाणार आहे. तसेच सध्याच्या कळवा खाडीवर अस्तित्वात असलेल्या पुलावरील ताण कमी होऊन येथील वाहतूककोंडी सुटण्यासही मदत होणार आहे. याशिवाय, कळव्यातून पुढे जाणाºया कळवा ते आत्माराम पाटील चौकादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सेवारस्ता तयार करण्यालाही मान्यता दिल्याने कळव्यातून थेट पारसिकनगर, मुंब्य्राकडे जाणारा रस्ता सुसाट होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांवर अंदाजे ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.सध्या कळवा खाडीपुलावर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तिसºया पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे कळवानाका ते विटावा आदी भागांत वाहतूककोंडी होत आहे. हा पूल झाला तरी वाहतूककोंडीची समस्या फारशी सुटणार नसल्याचे दिसत आहे. सध्या कळवा खाडीपुलावर ब्रिटिशकालीन पूल आहे. परंतु, तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. दुसरा पूल वाहतुकीचा ताण सहन करण्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे आता तिसºया पुलाचे काम वेगाने सुरूआहे. परंतु, एवढे होऊनही कळवानाक्यावर बॉटलनेक असल्याने भविष्यात या ठिकाणी वाहतूककोंडी होणार, हे निश्चित मानले जात होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून कळव्यातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. मागील हिवाळी अधिवेशनातदेखील त्यांनी विटावा ते कोपरी खाडीपूल आणि कळवा ते आत्माराम पाटील चौकापर्यंत रस्त्याचे काम करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. हे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आठ दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आता शासनाने विटावा ते कोपरीदरम्यान खाडीपुलाच्या कामाला मंजुरी दिली आहे. तसेच कळवा ते आत्माराम पाटील चौक रस्ता रुंदीकरण आणि सेवारस्त्याचा प्रकल्प मार्गी लावण्याबाबतही ग्रीन सिग्नल दिला आहे. या दोन्ही प्रकल्पांची कामे ठाणे महापालिकेने करावीत, असेही शासनाने आदेशात नमूद केले आहे.या पुलाच्या बांधकामासाठी ठाणे महापालिकेला तांत्रिक साहाय्याची आवश्यकता भासल्यास आवश्यकतेनुसार एमएमआरडीएने ते करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.नवी मुंबई तेकोपरी होणार सुसाट१ विटावा ते कोपरी खाडीपूल नवी मुंबईतील पटनी कंपनीपासून ते कोपरी असा दोन किमीचा असणार आहे. या पुलामुळे नवी मुंबईतून ज्यांना मुंबईत जायचे असेल, त्यांना हा शॉर्टकट ठरणार आहे. त्यामुळे कळवानाक्यावर किंवा विटावा पुलाखाली होणारी कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.२ या पुलावरून वाहतूक थेट कोपरीमार्गे ईस्टर्न एक्स्प्रेसला जाऊ शकणार आहे. तर, कळवानाक्याजवळ बॉटलनेक असल्याने कळव्यावरून रेतीबंदरपर्यंत जाण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. परंतु, आता या रस्त्याचेदेखील रुंदीकरण करण्यात येणार आहे.३कळवा ते आत्माराम पाटील चौक हा रस्ता सुमारे साडेपाच किमीचा आहे. आता त्याच्या रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाल्याने तो सुसाट होणार आहे. त्यातही या मार्गावर सेवारस्तादेखील होणार असल्याने लहान, हलक्या वाहनांसाठीदेखील हा रस्ता फायदेशीर होणार आहे.४या दोन्ही प्रकल्पांचा खर्च सुमारे ८०० कोटींच्या आसपास असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. एकूणच या दोनही प्रकल्पांमुळे कळव्याचा बॉटलनेक मोकळा होणार असून भविष्यात येथे वाहतूककोंडी नावालादेखील शिल्लक राहणार नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.मागील पाच वर्षे याबाबत पाठपुरावा सुरू होता. मागील हिवाळी अधिवेशनातदेखील या प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. आता शासनाने या प्रकल्पांना मंजुरी दिल्याने खºया अर्थाने कळव्याची कोंडी फुटणार आहे.- जितेंद्र आव्हाड, आमदार, कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र, राष्टÑवादी
विटावा ते कोपरी खाडीपुलाला मंजुरी, खाडीवर चौथा पूल, ठाणे पूर्वचा वळसा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:32 AM