शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अतिवापर नसलेले ॲप्स शक्यतो डाऊनलोड करू नये : डॉ. प्रकाश माळी यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 2:29 PM

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा "ई लर्निंगः- ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" आंतरराष्ट्रीय उपक्रमाचा दुसरा दिवस पार पडला.

ठळक मुद्देअतिवापर नसलेले ॲप्स शक्यतो डाऊनलोड करू नये : डॉ. प्रकाश माळी यांचा सल्लासतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय उपक्रम "ई लर्निंगः- ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" ( दिवसः- दुसरा )

ठाणे :  अलीकडेच शासनाने काही चिनी ॲप्सच्या वापरावर निर्बंध लादले, याकडे लक्ष वेधून अशा ॲप्सचा अनधिकृत वापर करणे, इतरांच्या बँक खाते, फेसबूक व इतर सोशल नेटवर्कींग साईटस् वरील माहितीचा अनधिकृतपणे वापर करणे हे सायबर गुन्हे असून यासंदर्भातील माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम- ४३ ए, ६६, ६९ सायबर लॉ कन्सल्टींग`चे संस्थापक निष्णात वकील डॉ. प्रशांत माळी यांनी विस्ताराने सांगितले.               `सायबर सुरक्षा` हा विषय `त्यांनी अगदी सखोलपणे मांडला. अतिवापर नसलेले ॲप्स शक्यतो डाऊनलोड करू नये, सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या विनामूल्य वायफायचा वापर टाळावा, असा सूचक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्याचबरोबर सोशल नेटवर्कींग साईटस् वर अश्लील चित्रफिती, छायाचित्रांचे प्रकाशन, संचारण व हस्तांतरण करणे हा गंभीर गुन्हा आहेच, परंतु अल्पवयीन मुला-मुलींसदर्भात हे गुन्हे अतिगंभीर ठरतात. यासंदर्भातील कलम- ६७, ६७ए, ६७बी यांची सविस्तर माहिती डॉ.माळी यांनी दिली. तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला न लपवता, वेळीच सायबर गुन्हे कक्षाकडे तक्रार केल्यास, अनेकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल हे निक्षून सांगितले. विनामूल्य डाऊनलोडींग ॲप्स, साईटस् चा वापर शक्यतो टाळावा असा सल्ला डॉ.माळी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

         सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे आणि मुंबई विद्यापिठाच्या वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय  स्तरावर 'ई-लर्निंग : ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडब्रँड.' ह्या  वेबिनारच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २७ हजार विद्यार्थ्यांनी या सात दिवसीय उपक्रमात सहभाग नोंदवला. भारताव्यतिरिक्त नायजेरिया, हॉंगकॉंग, कुवेत, नेपाळ, घाना, इथिओपिया, ओमान, यु.के, यु.एस संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया या राष्ट्रांतील विद्यार्थीही आवर्जून सहभागी झाले. दि. ०१ जुले रोजी, या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी  `सायबर सुरक्षा` व  `इंटरनेट बँकींग आणि पेमेंट ॲप्स` यांसारख्या अलिकडच्या काळातील अतिमहत्त्वाच्या विषयांवरील माहितीपूर्ण व्याख्यानांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला. त्यानंतर FI-ASK ( Forum of industry academic knowledge sharing ) या संस्थेचे सह- संस्थापक श्री. विकास पंडितराव यांनी `इंटरनेट बँकींग आणि पेमेंट ॲप्स` या विषयावर  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड यांचे महत्त्व आणि उपयोग विस्तृतपणे सांगितले. अॉनलाईन व्यवहारासाठी आपले बँक खाते UPI ( unified payment interface ) शी कसे जोडावे, ई- वॕलेटस् चा वापर कसा करावा, पेमेंटस् ॲपच्या साहाय्याने मोबाईल रिचार्ज,  डिटीएच रिचार्ज कसा करावा, वीज तसेच इतर बीले अॉनलाईन कशी भरावी इ. अनेक अॉनलाईन व्यवहारासंदर्भात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन  केले. आजच्या कार्यक्रमाची सूत्रे पूर्णपणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली. अशारितीने दुसऱ्या दिवसाची दोन्ही सत्रे माहितीपूर्ण व्याख्यानांनी रंगली. दि. ३० जून ते ६ जूलै, २०२० या कालावधीत दररोज विविध अभ्यासविषयांवर आधारित या व्याख्यानमालेचा आस्वाद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या उपक्रमाची सांगता ६ जुलै रोजी होणार आहे. तोपर्यंत https://forms.gle/4my6C7naMaE3YXyDA या लिंकवर ईच्छूक विद्यार्थ्यांना  विनामूल्य नावनोंदणी करता येणार आहे.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणcyber crimeसायबर क्राइम