भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्ग व कल्याण-भिवंडी राज्यमार्गावर रात्रीच्या वेळी वहाने अडवून वाहनचालकांना शस्त्राचा धाक दाखवित पैश्याची मागणी करणारे , तसेच पैसे न दिल्यास निर्दयीपणे त्यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यांना तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी सफेदकार मधील शस्त्रासह अटक केली. या टोळीने महामार्गावर उच्छांद मांडून पोलीसांना आव्हान निर्माण केले होते तर या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांनी लुटमार करणाºया टोळीचा धसका घेतला होता. मात्र टोळीच्या म्होरक्यांना अटक केल्याने या मार्गावरील दहशत कमी झाली आहे.मुंबई-नाशिक महामार्गावर व कल्याण-भिवंडी मार्गावर रस्त्याकडेला विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रेलर व टँकर चालकांवर शस्त्राने वार करून लुटल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना मागील आठवड्यात मध्यरात्री घडल्याने चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी या लूटमार प्रकरणी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला होता. मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे हद्दीत रिलायंस पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एलपीजी गॅस टँकर चालक तुकाराम कातकरे यास थांबवून त्याच्याकडे पैश्यांची मागणी केली. यावेळी पैसे देण्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या हातावर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून ८ हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून पळवून नेला. या घटनेच्या काही अंतरावर मुंबईकडे जाणाºया टॅन्करला सफेद कारने अडवून टॅन्कर चालक सुरज कुमार भारती यांस पैसे न दिल्याने बेदम मारहाण केली आणि शस्त्राने शरीरावर वार केले. तसेच त्याच्याकडून ४ हजार रूपये बळजबरीने चोरून नेले. तर भिवंडी-कल्याण मार्गावरील सरवली पाडा येथे रस्त्यालगत विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रेलर चालक कपिल वर्मा व क्लिनर सुनिल वर्मा या दोघांवर लुटारूंनी कोयत्याने वार करून त्यांच्याकडून १२ हजारांची रोख रक्कम हिसकावून चोरून नेली .जखमींवर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.या लुटमार प्रकरणी भिवंडी तालुका व कोनगांव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून लुटारूंचा शोध सुरू केला असता एमएच०४/ईएच २९५५ या क्रमांकाची सफेद कार हे कृत्य करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून या कारचा मालक तालुक्यातील सरवली गावातील संदिप कृष्णा पाटील(२८)असल्याचे पोलीसांना समजले. त्यावरून पोलीसांनी सापळा रचून त्यास रात्रीच्या वेळी एका हॉटेलमध्ये दारू प्यायलेल्या अवस्थेत ताब्यात घेतले.तसेच तालुक्यातील आमणे गावात रहाणारा त्याचा साथीदार अनिल अशोक अधिकारी (३१) याला पोलीसांनी अटक करून त्यांची सफेद कार ताब्यात घेतली .कारची तपासणी केली असता त्यामध्ये एक तलवार,एक सुरा व मोबाईल आढळून आला.पोलीसांनी कारसह शस्त्रे जप्त केली. दोन्ही आरोपींना भिवंडी कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीसांनी या दोन म्होरक्यांना अटक केली असून गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या मार्गावर उच्छांद मांडला होता. परंतू तुरळक घटनेमुळे वाहनचालकांनी पोलीसांकडे नोंद केली नव्हती.मात्र दहशत माजविण्याकरीता त्यांनी शस्त्राचा वापर करून निर्दयीपणे वाहनचालकांना मारहाण केल्याने शहर व ग्रामिण पोलीसांकडे तक्रारी दाखल झाल्या.त्यांना पकडणे पोलीसांना आव्हान बनले होते.तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास चौघुले यांनी पडघा टोलनाका,गोवा टोलनाका येथील सीसी टिव्ही कॅमेरे तपासले असता सफेद गाडीचा तपास लागला आणि गुन्हेगार गजाआड गेले.या टोळीत आणखी काहीजण असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तविली जात असून त्याचा तपास सुरू आहे.
महामार्गावर निर्दयपणे मारून वाहन चालकांना लुटणारी सशस्त्र टोळीचे म्होरके गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 8:34 PM
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्ग व कल्याण-भिवंडी राज्यमार्गावर रात्रीच्या वेळी वहाने अडवून वाहनचालकांना शस्त्राचा धाक दाखवित पैश्याची मागणी करणारे , तसेच पैसे न दिल्यास निर्दयीपणे त्यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यांना तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी सफेदकार मधील शस्त्रासह अटक केली. या टोळीने महामार्गावर उच्छांद मांडून पोलीसांना आव्हान निर्माण ...
ठळक मुद्देमहामार्ग व राज्यमार्गावर रात्रीच्या वेळी वहाने अडवून वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवित लुटमारतीन वाहनचालकांना मारहाण करून लुबाडल्याची पोलीसात तक्रारटोळींच्या म्होरक्यांकडून तलवार ,चाकू,मोबाईलसह कार जप्त