भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या पदसिद्ध अधिकाय््राांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या असहकाराच्या निषेधार्थ १९ जानेवारीपासुन आपापली दालने कुलूपबंद केली आहेत. त्याविरोधात सेना व काँग्रेसच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालिकेचे अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांना निवेदन दिले.
त्यात सत्ताधाऱ्यांना काम करायचे नसल्यास त्यांनी राजीनामे द्यावेत. तसेच महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता व सहा प्रभाग समिती सभापतींची दालने पालिकेच्या वास्तूंत असतानाही ती परस्पर बंद केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सत्ताधाय््राांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच सत्ताधाय््राांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्त दालनाबाहेर ठिय्या मांडून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. यापुर्वी देखील मेहता यांनी आयुक्तांच्या कारभाराविरोधात सर्व भाजपा नगरसेवकांनी सामुहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे सुपुर्द करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला काही नगरसेवकांनी नकार दिल्याने त्यांचा हा डाव उधळला गेला. यानंतर त्यांनी आपल्या मर्जीतील नगरसेवकांची माथी भडकावुन दालन बंदीचे नाटक केल्याचा आरोप सेना, काँग्रेसने केला आहे. मेहता हे पालिकेला स्वत:ची खाजगी कंपनी असल्यासारखे चालविण्यास प्रशासनाला भाग पाडत आहेत. भाजपाची एकहाती सत्ता आल्यापासुन पालिकेत भ्रष्टाचाराचा धुमाकूळ सुरु असुन त्याला प्रशासनाने आवर घालावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी केली. सत्ताधाय््राांचे हे नाटक असेच सुरु राहिल्यास सेना, काँग्रेस त्याविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला. यावेळी सेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका निलम ढवण, अनिता पाटील, भावना भोईर, दिप्ती भट, कुसूम गुप्ता, नगरसेवक दिनेश नलावडे, प्रवीण पाटील, अनंत शिर्के, राजू भोईर, राजेश वेतोस्कर, माजी नगरसेविका शुभांगी कोटीयन, पदाधिकारी अरुण कदम, शरद पाटील, लक्ष्मण जंगम, प्रकाश मांजरेकर व काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ शेख, राजीव मेहरा, अमजद शेख, नगरसेविका उमा सपार, रुबीना सय्यद, सारा अक्रम, माजी नगरसेवक प्रमोद सामंत, पदाधिकारी अंकुश मालुसरे आदी उपस्थित होते.
- सेनेच्या विरोधी पक्ष नेता पदाला लटकत ठेवणाऱ्या भाजपा सत्ताधाय््राांसह महापौर डिंपल मेहता व मार्गदर्शक आ. नरेंद्र मेहता यांचा निषेध व्यक्त करीत सेनेने त्या दालनात फित कापून विधीवत प्रवेश केला. या पदाचे दावेदार राजू भोईर यांना त्या दालनात अनौपचारिक प्रवेश देत सेनेसह काँग्रेसच्या नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकाऱ्यां त्यांना विरोधी पक्ष नेतापदी नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.