शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

घनकचराकर रद्द करण्यावरून सेना, भाजपात रंगला श्रेयवाद

By admin | Published: May 04, 2017 5:55 AM

घनकचरा सेवा शुल्क अखेर ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पलीय सभेने रद्द केल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी

अजित मांडके /ठाणेघनकचरा सेवा शुल्क अखेर ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पलीय सभेने रद्द केल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी प्रशासनाने मात्र याबाबत अद्यापही मौन धारण केले आहे. महासभेत चर्चा झाली असली तरीदेखील पालिकेचे आर्थिक हित लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. हा कर रद्द झाला तर २० कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागणार असून त्यामुळे याचे परिणाम विकास कामांवर होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवूनही हा कर रद्द केल्याच्या मुद्यावरून भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेयाचा वाद सध्या नौपाडा भागात रंगला आहे. मालमत्ताकरामध्ये समाविष्ट असलेल्या विविध लाभ करांमध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने अर्थसंकल्पात प्रस्तावित केला होता. परंतु,तीन दिवस रंगलेल्या अर्थसंकल्पीय महासभेत हा कर तर रद्द झालाच शिवाय, घनकचरा करही लोकप्रतिनिधींनी रद्द केला. त्यानुसार काही लोकप्रतिनिधींनी व्यापाऱ्यांशी संपर्क साधून तुमचा कर रद्द केल्याचे सांगून याचे श्रेय घेण्याचे राजकारण सुरु केले आहे. शिवसेना यात आघाडीवर आहे. तर भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांनीदेखील आम्हीच या कराच्या विरोधात महासभेत आवाज उठविल्याचे सांगून त्याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जुने ठाणे हा विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. परंतु, विधानसभा, त्यापाठोपाठ झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत येथील व्यापाऱ्यांनी भाजपाला स्पष्ट कौल दिला होता. त्यामुळे शिवसेनेला हा मोठ्ठा धक्का बसला होता. या धक्यातून शिवसेना अद्यापही सावरु शकलेली नाही. त्यामुळेच येथील गेलेली मते परत मिळविण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु, भाजपालादेखील येथील मते अबाधीत ठेवायची असल्याने तेदेखील पेटून उठले आहेत. त्यामुळे ज्या वेळेस पालिकेने व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर कचरा टाकण्याचा प्रताप केला, त्यानंतर शिवसेना आणि भाजपाची मंडळी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभी राहिल्याचे दिसून आले. त्यानंतर हा जिझीया कर रद्द करण्याचा दावा दोघांकडूनही करण्यात आला होता. त्यानुसार अर्थसंकल्पीय सभेत हा कर रद्द करण्याचा ठराव केल्याचा दावा केला आहे. त्यानुसार याचे मार्केटींगदेखील त्यांनी सुरु केले आहे. करुन दाखविले म्हणत शिवसेना येथील मतदारांना म्हणजेच व्यापाऱ्यांना आम्हीच कर रद्द करुन दाखविलाचा दावा करीत आहे. तर दुसरीकडे भाजपानेदेखील आम्ही कर रद्द केल्याच्या वल्गना केल्या आहेत. त्यात व्यापारी वर्गातदेखील शिवसेना आणि भाजपा असे दोन वर्ग असल्याने या दोघांकडून आपापल्या पक्षातील नेत्यांचे मार्केटींग सुरु झाले आहे. मुळात कचऱ्यावरील कराचा ठराव याच मंडळींनी २०१५ च्या सुमारास मंजूर केला होता. त्यानंतर २०१६ पासून त्याची आकारणी सुरु झाली. असे असतांना आता अर्थसंकल्पीय चर्चेत हा ठराव रद्द कसा करता येऊ शकतो, याचा अभ्यास आता प्रशासनाने सुरु केला आहे. किंबहुना ही व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक तर नाही ना? अशी चर्चादेखील आता सुरु झाली आहे. या संदर्भात संबधींत विभागाकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तीन दिवसांच्या सभेत केवळ चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अशा प्रकारचा काही ठराव झाला असेल तर तो अद्यापही प्रशासनाच्या हाती पडलेला नाही. तो ठराव हाती पडला तरी पालिकेचे आर्थिक हित लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) कर रद्द केल्याने विकासावर परिणाम?घनकचऱ्यावरील कर रद्द केल्याचा दावा केला जात असला तरी पालिकेने आतापर्यंत या करापोटी ८५ लाखांची वसुली केली आहे. तर येत्या आर्थिक वर्षात या करापोटी २० कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु आता त्यावर पाणी फेरण्याची शक्यता वर्तविली जात असून यामुळे विकासावरदेखील परिणाम होईल, असे बोलले जात आहे. घनकचरा सेवा शुल्क वसूल करण्यावरून महापालिका आणि ठाण्यातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा संघर्ष निर्माण झाला होता. कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर कचरा टाकणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न आता व्यापारी वर्गाकडून विचारला जाऊ लागला आहे.