कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलरासू हे सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविकांची नव्हे, तर राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांची कामे करतात, असा आरोप करीत, शिवसेनेच्या नगरसेविकांनी मंगळवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन व घोषणाबाजी केली. बंद दालनाच्या दरवाजांवर लाथा मारणे, शिवीगाळ करणे आणि खुर्च्यांची मोडतोड असा धिंगाणा या नगरसेविकांनी घातला.
सेना नगरसेविकांचा 'केडीएमसी'त गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 5:00 AM