जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई तसेच ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ आरोपींकडून त्यांची शस्त्रे जमा करावीत, त्यांना लवकरात लवकर अटक करावी. तसेच त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी पोलीस संरक्षण दिले जावे, अशी मागणी केतन तन्ना, क्रिकेट बुकी सोनू जालान आणि रियाझ भाटी यांनी ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे केली आहे.उपायुक्त अंबुरे यांना दिलेल्या पत्रात केतन तन्ना यांच्यासह तिघांनीही परमबीर सिंग, ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त दीपक देवराज, तत्कालीन निरीक्षक प्रदीप शर्मा, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम तसेच खासगी व्यक्ती संजय पुनामिया, विकास दाभाडे, कुख्यात गुंड रवी पुजारी आणि विमल अग्रवाल अशा सर्वांकडेच शस्त्रे असून त्यांची ही शस्त्रे जमा केली जावीत. यातील विमल अग्रवाल हा तर अगदी अलिकडे केतन तन्ना यांच्या इमारतीखालीच नाचतांनाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आपल्या कुटूंबीयांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे तन्ना यांचे म्हणणे आहे. मनसुख हिरेन हे देखिल एका महत्वाच्या प्रकरणात साक्षीदार असल्यामुळे त्यांचा नियोजनबद्धपणे खून करण्यात आला. त्यामुळेच शर्मा यांच्यासह इतरही आरोपींकडून आपल्याला धोका असून त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे. तसेच परमबीर यांच्यासह सर्वच २८ आरोपींना अटक केली जावी, अशी मागणी तन्ना आणि जालान यांनी ठाणे पोलिसांकडे केली आहे............................का वाटते भीती?आरोपींपैकी विमल अग्रवाल याचा भाऊ किशोर अग्रवाल याने केतन तन्ना यांचा मुलगा जय तन्ना याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून तब्बल सव्वा कोटींची खंडणी उकळली होती. हीच भीती आता तक्रारदारांमध्ये असल्यामुळे त्यांची ही शस्त्रे पोलिसांनी जमा करण्याचा आग्रह धरला आहे.
परमबीर सिंग यांच्यासह सर्व आरोपींची शस्त्रे जमा करुन त्यांना अटक करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 10:19 PM
आरोपींपैकी विमल अग्रवाल याचा भाऊ किशोर अग्रवाल याने केतन तन्ना यांचा मुलगा जय तन्ना याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून तब्बल सव्वा कोटींची खंडणी उकळली होती. हीच भीती आता तक्रारदारांमध्ये असल्यामुळे त्यांची ही शस्त्रे पोलिसांनी जमा करण्याचा आग्रह धरला आहे.
ठळक मुद्दे आरोपींकडून संरक्षण मिळावेतक्रारदारांनी व्यक्त केली भीती