- लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उथळसर भागातील जुगार अड्डयावरील छाप्यात नरेश भुकाणी याच्यासह चौघांना राबोडी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून तीन हजार ५० रुपयांची रोकड आणि जुगाराची सामग्री हस्तगत केली आहे.दत्तू शेलार (६५), कमाउद्दीन मोहद (५५) आणि आबा भोये (३८) अशी या प्रकरणी अटक केलेल्या उर्वरित तिघांची नावे आहेत. या चौघांची ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. तर अड्डाचालक वासीम हा मात्र छाप्याच्या धुमश्चक्रीत पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुगार अड्ड्यावरील छाप्यात चौघांना अटक
By admin | Published: May 17, 2017 2:04 AM