लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उत्तर प्रदेशातील अनेक चोऱ्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या अल्पवयीन १६ वर्षीय आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून गुरुवारी सिडको बस स्टॉप चेंदणी कोळीवाडा येथून ताब्यात घेतले. त्याला भिवंडीच्या बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश उल्हासनगर येथील बाल न्यायालयाने दिले आहेत.उत्तरप्रदेश राज्यातील बाबुपुरवा पोलीस स्टेशन, कानपुर हर जि . कानपुर, येथे विविध घरफोड्या, चोरी गुन्ह्यातील आरोपीच्या तपासासाठी ठाणे शहरात पोलीस मदत मिळावी, अशी मागणी उत्तरप्रदेश पोलिसांनी पोलीस लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे चेंदणी कोळीवाडा येथे सापळा रचून ४ मार्च रोजी या कुप्रसिध्द जुबेर पिकर गँगचा (गँगचे नाव बदलेले आहे) म्होरक्याला ताब्यात घेतल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील घरफोडया करणाऱ्या कुप्रसिध्द गॅगचा अल्पवयीन म्होरक्याची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 11:03 PM
उत्तर प्रदेशातील अनेक चोऱ्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या अल्पवयीन १६ वर्षीय आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून गुरुवारी सिडको बस स्टॉप चेंदणी कोळीवाडा येथून ताब्यात घेतले.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कामगिरीभिवंडीच्या बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश