ठाणे : झोपमोड झाल्याचा राग अनावर होऊन गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणाºया विद्यालयाच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांना पोलिसांनी शुक्रवारी ठाण्यातून अटक केली.तसेच ठाणे जिल्हा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, शुक्रवारी पोलिसांनी शाळा गाठून इतर विद्यार्थ्यांकडेत्यांना मारहाण झाली आहे का, याबाबत विचारणा केली. या प्रकरणी तक्रारदारांमध्ये वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पाचवी ते दहावीत शिकणाºया विद्यार्थ्यांना विश्वस्त शिल्पा गौतम (४५) यांनी मारहाण केली. तसेच पालकांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. हा प्रकार बुधवारी घडल्यानंतर गुरुवारी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या आवारात एकत्र येऊन ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. १८ विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, मारहाण आणि २०१५च्या बालक अधिनियमानुसार शिल्पा गौतम यांच्याविरोधात गुरुवारी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तसेच शुक्रवारी सकाळी शिल्पा गौतम यांना अटक करत ठाणे जिल्हा न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली.तक्रारदार वाढणार?गुरुवारी १८ विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या वेळी ५०-६० विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे म्हटले होते. त्यानुसार, या प्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस पोहोचले शाळेत५०-६० विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटल्याने शुक्रवारी पोलीस त्या शाळेत पोहोचले. तसेच इतर कोणत्या विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे, याबाबत विचारणा केली. जर कोणत्या विद्यार्थ्याला मारहाण झाली असेल, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी पालकांना केले आहे.गंभीर दुखापत नाहीगुरुवारी पोलिसांनी मारहाण झालेल्या तब्बल १८ विद्यार्थ्यांना सिव्हिल रुग्णालयात पाठवून तपासणी केली. दरम्यान, डॉक्टरांनी त्या विद्यार्थ्यांचेएक्स-रेही काढले. विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपात मारहाण झाली नसल्याचे त्या अहवालात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.‘त्या शाळेचे व्यवस्थापन त्वरित रद्द करा’गौतम विद्यालयात विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीच्या घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी समाज संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राज राजापूरकर यांनी मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली.त्यानुसार, शिक्षण उपसंचालक विभागाने आलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शुक्रवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकाºयांना पत्र पाठवून हिंदू मिशन एज्युकेशन सोसायटी या संस्थेतर्फे चालत असलेल्या गौतम विद्यालयाचे व्यवस्थापन त्वरित रद्द करून प्रशासकीय अधिकाºयाची नेमणूक करण्याबाबत सूचना केल्या आहेत. हे पत्र मुंबई विभाग, विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी पाठवले आहे.
गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विश्वस्ताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:27 AM