लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर येथील रहिवासी भाऊसाहेब पाटील (४६, रा. कोल्हापूर) यांची फसवणूक करणाऱ्या संदीप कांबळे ( ३७, रा. घाटकोपर, पूर्व, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी अटक केली. गेल्या सहा वर्षांपासून औरंगाबाद आणि कोल्हापूर येथील पोलीस त्याच्या मागावर होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी रविवारी दिली.युनिट एकचे पथक हे १३ नोव्हेंबर रोजी शीळ डायघर परिसरात गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी गस्त घालीत होते. त्याच वेळी कांबळे याची माहिती या पथकाला एका खबऱ्याकडून मिळाली. त्याआधारे देशमुख यांच्यासह पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, जमादार रवींद्र पाटील, हवालदार विक्रांत लोहार आणि उमेश जाधव आदींच्या पथकाने सापळा रचून त्याला याच भागातून ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्याने कोल्हापूरच्या या फसवणुकीसह कोल्हापूरच्याच जुना राजवाडा तसेच औरंगाबादच्या कन्नड पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचीही त्याने कबुली दिली. त्याची माहिती दिल्यानंतर कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्याचे तपास पथक रविवारी ठाण्यात दाखल झाले. त्याला या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचा २०१५ पासून औरंगाबाद आणि कोल्हापूर पोलीस शोध घेत होते. परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता.
भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 12:20 AM
भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर येथील रहिवासी भाऊसाहेब पाटील (४६, रा. कोल्हापूर) यांची फसवणूक करणाऱ्या संदीप कांबळे ( ३७, रा. घाटकोपर, पूर्व, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी अटक केली.
ठळक मुद्देकोल्हापूर आणि औरंगाबादच्या नागरिकांना घातला गंडाठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी