लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून तब्बल दोन कोटी १३ लाखांचा गंडा घालणाऱ्या चेतन जीवराज दंड (४२) याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्याला १७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.चेतन याने २०१४ पासून देसर इन्व्हेस्टमेंट या बनावट नावाने कंपनीची जाहिरात फेसबुक, गुगलवर प्रसारित केली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठया रकमेचा परतावा मिळेल, असेही त्याने या जाहिरातीत म्हटले होते. जाहिरात वाचून अनेकांनी त्याच्याकडे गुंतवणूकही केली. त्यानंतर काही महिने गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला. मात्र, नोव्हेंबर २०१९ पासून गुंतवणूकदारांना कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.यामध्ये चेतन याला ६ जुलै २०२१ रोजी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर गुंतवणूकदारांची दोन कोटी १३ लाख २५ हजाररु पयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून दोन कोटींचा गंडा घालणारा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 11:30 PM
गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून तब्बल दोन कोटी १३ लाखांचा गंडा घालणाऱ्या चेतन जीवराज दंड (४२) याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे.
ठळक मुद्देपोलीस कोठडीत रवानगी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई