शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

तलवारीच्या धाकावर तरुणाचे अपहरण करणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 11:41 PM

पूर्ववैमनस्यातून तलवारीच्या धाकावर अयतीशान खान (१९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या तरुणाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील साहिल उर्फ आशु प्रमोद मिश्रा (२२, रा. हाजूरी, ठाणे) यास वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाईपूर्ववैमनस्यातून केला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पूर्ववैमनस्यातून तलवारीच्या धाकावर अयतीशान खान (१९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या तरुणाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील साहिल उर्फ आशु प्रमोद मिश्रा (२२, रा. हाजूरी, ठाणे) यास वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.अयतीशखान आणि त्याचा मित्र मौसिम खान हे जिलानीवाडी मस्जिदच्या गेटजवळ वागळे इस्टेट येथे १२ जुलै रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्यावेळी बहाद्दुरसिंग मेहरा, शाहरुख खान, साहिल उर्फ आशु आणि अन्य एक जण असे चौघेजण दोन वेगवेगळया मोटारसायकलीवरुन तिथे आले. त्यांनी तलवारीच्या धाकावर अयतीशान याला त्यांच्या मोटारसायकलीवर बसवून ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करुन श्रीनगर, रामनगर भागातील जंगलात नेले. या टोळक्यापैकी बहाद्दूर याने शाहरुख याच्या हातातील तलवार घेऊन अयतीशान आणि त्याच्या मित्राला शिव्या देत तलवारीच्या पुढील टोकाने मौसिम याच्या पाठीवर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. नंतर या टोळक्याने आपसात संगनमत करुन अयतीशान आणि मौसिम या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी शाहरुख याने मौसिम याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करुन जखमी केले. त्यानंतर पुन्हा पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलींवर त्यांना बसवून काल्हेर येथील टोल नाक्याच्याजवळ नेऊन तिथेही पुन्हा लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर तुम्हाला आणि तुमच्या आईवडिलांना ठार मारु, अशी धमकीच बहाद्दूर याने त्यांना दिली. या प्रकरणी १३ जुलै रोजी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ आदींच्या पथकाने यातील आशु उर्फ साहिल याला अटक केली. उर्वरित इतरांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी