ठाणे : पूर्ववैमनस्यातून बहिणीवर चाकूचे वार करून खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या अल्तमेश कुरेशी (१९, रा. भायखळा, मुंबई) या आरोपीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ च्या वागळे इस्टेट पथकाने शनिवारी मुंब्य्रातून अटक केली. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबईतील भायखळा येथील कुरेशी चाळीत राहणार्या शाहीसा अन्वर कुरेशी (२२) या आपल्याच बिहणीच्या पोटावर कौटुंबिक वादातून चाकूने वार करून ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पसार झालेला अल्तमेश हा मुंब्रा भागात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, अनिल सुरवसे, जमादार शरद तावडे, पोलीस हवालदार जगदीश न्हावळदे, राजेश क्षित्रय आणि शिवाजी रायसिंग आदींच्या पथकाने ७ नोव्हेंबर रोजी अल्तमेश याला ताब्यात घेतले. नंतर त्याला भायखळा पोलिसांनी अटक केली. अल्तमेश याच्यासह त्याचा भाऊ इकबाल, फातिमा आणि शिमम यांनीही तिला तसेच तिचे वडील अन्वर कुरेशी यांनाही मारहाण केली. इकबाल आणि अल्तमेश यांनी शाहीसा हिच्यावर चाकूने वार करून ते पसार झाले होते. तिला गंभीर जखमी अवस्थेत रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बहिणीच्या खूनाचा प्रयत्न करून मुंबईतून पसार झालेल्यास मुंब्य्रातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 11:58 PM
पूर्ववैमनस्यातून बहिणीवर चाकूचे वार करून खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या अल्तमेश कुरेशी (१९) या आरोपीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ च्या वागळे इस्टेट पथकाने शनिवारी मुंब्य्रातून अटक केली. नव्यानेच खंडणी विरोधी पथकातून वागळे इस्टेट युनिटचे प्रभारी अधिकारी म्हणून दाखल झालेले विकास घोडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
ठळक मुद्दे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांची पहिलीच कामगिरीगुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ च्या वागळे इस्टेट पथकाने केली अटक