शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

‘स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:52 PM

ठाण्यात कारवाई : तरुणींची सुटका

ठाणे : वागळे इस्टेट येथील एका नामांकित हॉटेलमधील इमारतीमध्ये स्पा आणि मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाºया प्रसाद शंकरन (४८, रा. मरोळ, मुंबई) या स्पाचालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्या तावडीतून पाच पीडित तरुणींची सुटका केली आहे.

‘हॉटेल शरणम्’च्या पाचव्या माळ्यावर ‘केरळ आयुर्वेदिक ट्रीटमेंट सेंटर’ नावाचे स्पा चालविले जाते. येथे काही तरुणींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. त्या आधारे कडलग यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने यांच्या पथकाने या स्पावर छापा टाकला. यावेळी काही तरुणींना पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांशी शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे आढळले. ग्राहकांकडून पाच ते दहा हजार रुपये घेऊन या तरुणींना त्यातील काही वाटा देण्याचे आमिष दाखविले जायचे. हे रॅकेट चालविणाºया शंकरन याला अटक केली असून त्यांच्याकडून रोकड आणि काही सामग्री हस्तगत केली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.