सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिकेचा मुकादम संजय पेडामकर याला एका शोरमा विक्री करणाऱ्या कडुन २ हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी बुधवारी रात्री ८ वाजता अटक केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील एका शोरमा विक्री करणाऱ्याला हातगाडी लावण्यासाठी महापालिका मुकादम संजय पेडामकर याने अड्डीच हजार रुपयांची लाच मागितली. महापालिका हातगाडीधारकाला दरदिवशी ४० रुपयांची पावती फाडून रक्कम वसुल केली जाते. असे असतांनाही अतिरिक्त पैसे मागितले गेले. हातगाडी लावण्यासाठी सुरवातीला अड्डीच हजार रुपयांची मागणी केल्यावर २ हजार रुपये निश्चित केले.
दरम्यान शोरमा विक्रेत्याने या बाबतची तक्रार ठाणे अंटीकरप्शन विभागाकडे केली. बुधवारी रात्री ८ वाजता कॅम्प नं-५ येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी सापळा लावला असता मुकादम संजय पेडामकर याला २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी