शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:43 AM

विवाहित असूनही लग्नाचे तसेच नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया कामेश मरोठीया (२८, रा. चिरागनगर, ठाणे) या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली.

ठळक मुद्दे खंडणी विरोधी पथकाची कारवाईभावाला ठार मारण्याची धमकी देत केला गर्भपात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: विवाहित असूनही लग्नाचे तसेच नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया कामेश मरोठीया (२८, रा. चिरागनगर, ठाणे) या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली. त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.चिरागनगर भागात राहणारा कामेश हा ठाण्यातील एका नामांकित खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करतो. त्याचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेले आहे. विवाहित असल्याची बाब लपवून ठेवून त्याच कंपनीत नोकरी शोधण्यासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीशी त्याने १४ जून २०२० रोजी नोकरी लावण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. तो तिच्यावर खरे प्रेम करीत असल्याचे तिला तसेच तिच्या कुटूंबीयांना त्याने भासविले. तसेच तिच्या मोबाईल आणि व्हॉटसअ‍ॅपवर मेसेजही केले. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीही तिला एकांतात भेटून तिला रक्ताचा टिळक लावून तिला पत्नी म्हणून स्वीकारल्याचे तसेच लवकरच त्याच्या आई वडिलांना सांगून तिच्याशी लग्न करणार असल्याचाही त्याने बहाणा केला. त्याच बहाण्याने त्याच्या आई वडिलांना भेटण्याचे निमित्त करुन १४ जून २०२० रोजी आणि त्यानंतरही तीन दिवसांनी ठाण्यातील चिरागनगर येथील त्याच्या घरी बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात ती गरोदरही राहिली. यातून आपले बिंग फुटेल म्हणून त्याने तिला समतानगर येथील एका खासगी रुग्णालयात १६ आॅक्टोंबर २०२० रोजी तिला दाखल करुन तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. सध्या मूल जन्मास घालणे आपल्यासाठी चांगले नसल्याचे सांगून तिच्यावर दबाव आणून भावाला ठार मारण्याची धमकी देत गर्भ पाडण्यासाठीही दबाव आणला. नंतर गर्भ पाडण्यास तिची सहमती मिळवून तिचा विश्वासघात केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मार्च २०२० ते २४ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल पिडीत तरुणीने त्याच्याविरुद्ध ७ जुलै २०२१ रोजी अखेर लैंगिक अत्याचार, धमकी आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाले, पोलीस नाईक प्रशांत बुरके आणि संदीप भांगरे आदींच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कामेश याला कोपरखैरणे येथून १० जुलै २०२१ अटक केली. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन ढोले हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी