मेघनाथ विशे
पडघा : मुंबई- नाशिक महामार्गावर पडघ्याजवळील खडवली फाटा येथे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता प्रवासी वाहतूक करणारी काळी- पिवळी जीप व ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात जीपमधील सहा जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून एका विद्यार्थिनीला किरकोळ दुखापत झाली आहे. रिक्षा नसल्याने जीपने पडघ्याहून खडवली स्टेशनवर जात असताना हा अपघात झाला.
पडघा बसस्थानकावर खडवलीसाठी रिक्षा नसल्याने विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांनी पडघा- भिवंडी मार्गावर चालणाऱ्या जीपचालकाला खडवली स्टेशन येथे सोडावे, अशी विनंती केली. मात्र, महामार्गाहून खडवलीकडे रस्ता ओलांडत असताना खडवली फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रेलरने जीपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ७० ते ८० फूट अंतरापर्यंत ट्रेलरने जीपला फरफटत नेले.
कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा n अपघातात चिन्मयी शिंदे (१५, रा. वाहुली-पडघा), रिया परदेशी (पडघा), प्रज्वल फिरके (१८, पडघा), चैताली पिंपळे (२८, पडघा), संतोष जाधव (५०, पडघा), वसंत जाधव (५०, भातसई) यांचा मृत्यू झाला. जीपचालक जावेद शेख, दिलीप विश्वकर्मा, चेतना जरे, कुणाल भामरे गंभीर जखमी झाले आहेत. n जान्हवी वाळंज ही किरकोळ जखमी झाली. ट्रेलरचालक शिवशंकर प्रजापती, पडघा टोलनाका रोडचे कंत्राटदार, सिगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कंत्राटदार तसेच रॉकटँक कंपनीचे रोड कंत्राटदार यांच्यावर फिर्यादी भगवान सांबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
खडवली फाटा अपघाताचे केंद्रमुंबई- नाशिक महामार्गावर खडवली फाटा हे अपघाताचे ठिकाण मानले जाते. दररोज येथे किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ८ जुलैला येथेच एका ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.