ठाणे : कळवा आणि मुंब्य्रात ज्या वेगाने कोरोनाचा प्रार्दुभाव झाला त्यापेक्षा जास्तीच्या वेगाने लोकमान्य नगर आणि वागळे पट्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. या दोनही प्रभाग समितीमध्ये दिवसाला ८ ते १० रुग्ण वाढत आहेत. त्यातही सीपी तलाव परिसरातील रुग्णांची संख्या यात सर्वाधिकआहे. या दोनही प्रभाग समितीत मिळून १२४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. परंतु ते केवळ या दोनही भागातील प्रत्येकी एका व्यक्तीच्या चुकीमुळे आणि प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळेच हे झाल्याची बाब समोर आली आहे. ठाणे शहरात आजच्या घडीला कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ३५० च्या घरात गेली आहे. परंतु मागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा हा वाढतांना दिसून आला आहे. एककीडे कळवा, मुंब्रा भागात कोरोना वाढीचा वेग मंदावला असतांना दुसरीकडे लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती आणि वागळे इस्टेट प्रभाग समितीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. मागील तीन दिवसात या भागात रुग्णांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढतांना दिसत आहे. त्यातही वागळे इस्टेट या भागातील सीपी तलाव परिसरात सर्वाधीक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एका नागरीकाच्या चुकीमुळे ही वेळ येथील रहिवाशांवर आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या घरातीलच २५ ते ३० जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. या व्यक्तीच्या माध्यमातून येथील नागरीकांना मोफत अन्नदान दिले जात होते. परंतु आता तेच किती महागात पडले आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याला नियमंत्रण कसे मिळयावयचे असा पेच पालिकेला सतावू लागला आहे. तर लोकमान्य नगर भागातील एका मृत व्यक्तीचा रिपोर्ट उशिराने आल्याने येथील रहिवाशांना आता पालिकेच्या चुकीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. शुक्रवार पर्यंत या दोनही प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी ६२ रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजेच या दोन प्रभाग समितीमध्ये १२४ रुग्ण आहेत.दुसरीकडे मुंब्य्रात आतापर्यंत ५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नौपाडा, कोपरी प्रभाग समितीत आतापर्यंत ४१ जणांना कोरोना लागण झाली आहे. उथळसर ३४, कळवा ३३, वर्तकनगर २६, माजिवडा मानपाडा २३ आणि दिवा प्रभाग समितीत ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
वागळे आणि लोकमान्य नगर भागात कोरोनाचा चढता आलेख, दोन प्रभाग समितीत १२४ कोरोना बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 3:53 PM